छत्रपती संभाजीराजे राष्ट्रवादीच्या नारायण गलांडेंच्या पाठीशी! नारायण आमदार झालेले पाहायचेय!

छत्रपती संभाजीराजे राष्ट्रवादीच्या नारायण गलांडेंच्या पाठीशी! नारायण आमदार झालेले पाहायचेय!

पुणे : राज्यसभेतील खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात एका कार्यक्रमात भाषण करून राजकीय धुरळा उडविला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नारायण गलांडे यांना आमदार झालेले बघायचे, असे सूचक बोलून संभाजीराजेंनी चर्चेला जोर मिळवून दिला आहे.

गलांडे यांची राष्ट्रवादीच्या पदावर नव्याने नियुक्ती झाली आहे. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन केले.  आमदारकीची आगामी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी आमदार बापू पठारे, नगरसेवक सुनील टिंगरे आणि पक्षाचे आजी माजी नगरसेवकही या वेळी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीराजे आणि गलांडे कुटुंबियांचे निकटचे संबंध आहेत. त्यामुळे गलांडे यांच्या वाढदिवसाला संभाजीराजेंनी आवर्जून उपस्थिती लावली. शुभेच्छापर केलेल्या भाषणाची त्यांनी मी जास्त काही राजकीय बोलणार नाही, अशी सुरवात केली.

``छत्रपती संभाजी नेहमी त्यांच्या बरोबर असणार आहे, असा शब्द त्यांनी दिला. आता पुढच्या वेळी नारायणने नगरसेवकची निवडणूक लढायची नाही. त्याला आपल्याला आमदारच बघायचे आहे, अशी भविष्यवाणी वर्तवून त्यांनी गलांडे समर्थकांच्या टाळ्या मिळवल्या. नारायण यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवायला माझा विरोधच होता. यापुढे नगरसेवकपदाची निवडणूक लढवायची नाही, असे सांगून त्यांनी गलांडे यांची दिशा स्पष्ट केली.

संभाजीराजे यांचे भाजपमध्ये वजन आहेच. याशिवाय राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही त्यांनी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले आहेत. ते आता नारायण गलांडेंसाठी कोणत्या पक्षाची दिशा दाखविणार याची उत्सुकता आहे. त्यांचे हे भाषण गलांडे समर्थकांना नवीन ताकद मिळवून दिले. त्यासोबत मतदारसंघात नवीन चर्चाही घडवून गेले एवढे मात्र खरे!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com