Chatrapati Sambhajraje in Russia | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

तरूण खासदारांच्या परिषदेसाठी खासदार संभाजीराजे रशियात

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

भारत, रशिया, चीन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील तरुण खासदार, वैज्ञानिक, प्रशासकीय नेते यांची एक परिषद रशियात आजपासून सुरू झाली आहे. या परिषदेसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची निवड झाली आहे. 

पुणे : ब्रिक्स देशांतील तरुण खासदारांची पहिली रशियात आजपासून सुरू झाली असून या परिषदेसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे, चिराग पासवान आणि श्रीनिवास केसिनेने हे भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 
ही परिषद 11 ते 14 ऑक्टोबर दरम्यान रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग या शहरात पार पडणार आहे.

 

ब्रिक्स देशांची पहिली यंग पार्लमेंट फोरम ब्रिक्‍स युथ समिट 2017 च्या अंतिम कृती आराखड्यानुसार तयार केली आहे. यामध्ये आंतर-संसदीय समितीच्या वेगवेगळ्या बैठखा आयोजित केल्या जाणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा "ब्रिक्‍स'मध्ये समावेश होतो. "ब्रिक्‍स'ची शिखर परिषद नुकतची चीनमध्ये पार पडली होती. त्यानंतर संबंधित देशातील युवा नेत्यांना एकत्र आणण्याचा उपक्रम पीटर्सबर्गमध्ये पार पडत आहे. या पाचही देशांतील समस्यांवर या परिषदेत चर्चा केली जाणार आहे. तसेच या देशांतील युवा नेतृत्त्वांत परस्पर संबंध दृढ करण्यासाठीही या परिषदेचा उपयोग होणार आहे. प्रत्येक खासदाराला येथे एका विषयाचे सादरीकरण करायचे आहे.

संबंधित लेख