chanrdrakantdada planning for grampanchayat | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

चंद्रकांतदादा ठरवणार ग्रामपंचायतींची रणनिती! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 ऑगस्ट 2017

सातारा जिल्हा नियोजन समितीतील यशानंतर भारतीय जनता पक्षाने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या जिल्ह्यातील 339 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन या निवडणुकीची गावनिहाय रणनिती ठरविली जाणार आहे. 

सातारा : नियोजन समितीतील यशानंतर भारतीय जनता पक्षाने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या जिल्ह्यातील 339 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन या निवडणुकीची गावनिहाय रणनिती ठरविली जाणार आहे. 

जिल्हा नियोजन समितीत भाजपशी हात मिळवणी करत राष्ट्रवादीने सर्व विरोधकांना धुळ चारली. त्याचा फायदा भाजपला झाला. नियोजन समितीत त्यांचे चार सदस्य गेले. आता भाजपच्या नेत्यांचे टार्गेट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या जिल्ह्यातील 339 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. ग्रामपंचायत निवडणुका या पक्षिय पातळीवर सहजासहजी होत नाहीत. पण यावेळेस सरपंच निवड ही थेट जनतेतून असल्याने सर्वच पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने बहुतांशी ग्रामपंचायती त्यांच्याकडेच आहेत. पण काही ठिकाणी राष्ट्रवादीतच दोन गट आहेत. येथे दुसऱ्या गटाला हाताशी धरून भाजप ग्रामपंचायतीत एंट्री मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. पण दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ग्रामपंचायत पातळीवरील निवडणुकाही पक्षाच्या चिन्हावर लढण्याबाबात एकमत करण्याचे प्रयत्न सुरू केल आहेत. त्यामुळे भाजपलाही पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी सहकारमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर तसेच प्रमुख पदाधिकारी यांची स्वतंत्र बैठक होऊन यामध्ये गावनिहाय रणनिती आखली जाणार आहे 
दरम्यान, भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत थेट नगराध्यक्ष निवडीत भाजपला वाई व कऱ्हाड पालिकेत फायदा झाला आहे. तोच ट्रेण्ड ग्रामपंचायत निवडणुकीत राखता यावा यासाठी भाजपचे नेते तयारी करत आहेत. 
 

संबंधित लेख