changgan bhujbal | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या, भुजबळांचे  तुरूंगातून सहकार मंत्र्यांना पत्र 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 27 मे 2017

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे संध्या तुरूंगात असलेले माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था पाहून वाईट वाटले आहे. त्यामुळे तुरुंगातुन भुजबळ यांनी राज्याच्या सहकार मंत्र्यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची मागणी केली आहे. गेल्या 5 महिन्यात जिल्ह्यात 37 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत याकडे त्यांनी या पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. 

शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करणारी आणि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. कर्जमाफीच्या आशेने जिल्हा बॅंकेची कर्जवसुली ठप्प झाली आहे. याचा थेट परिणाम पीक कर्ज वाटपावर झाली असून खरीप हंगामाच्या तयारीला लागले शेतकरी पीक कर्ज कधी मिळेल या आशेवर आहेत. मात्र बॅंकेच्या आर्थिक अडचणीमुळे पीक कर्ज मिळण्याची शक्‍यता धूसर झाली आहे. याची आणखी कारणे आहेत. नोट बंदीच्या काळात बॅंकेच्या जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने याआधीच बॅक अडचणीत सापडली होती. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. 

1 जानेवारी ते 20 मे 2017 या कालावधीत जिह्यातील 37 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी पीक कर्ज मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने नाशिक जिल्हा बॅंकेला अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे भुजबळांनी केली आहे.  

संबंधित लेख