change image vishnu sawara advise rajendra gavit | Sarkarnama

खासदार गावितांनी आपली भूमिका बदलावी. पालकमंत्र्यांचा सल्ला

नीरज राऊत
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पालघर : खासदारपदी निवडून आलेले राजेंद्र गावीत हे सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधित्व करीत असून त्यांनी आपली भूमिका बदलावी असा प्रेमपूर्वक सल्ला पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जाहीर कार्यक्रमादरम्यान दिला.

पालघर : खासदारपदी निवडून आलेले राजेंद्र गावीत हे सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधित्व करीत असून त्यांनी आपली भूमिका बदलावी असा प्रेमपूर्वक सल्ला पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जाहीर कार्यक्रमादरम्यान दिला.

गावीत यांनी आपल्या मतदार संघातील समस्या व्यासपीठावरून नव्हे तर संसदेत मांडाव्यात असा ठोस लावून खासदार यांच्यावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला.
पालघर जिल्ह्याच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये भाषण करताना जिल्ह्यातील रिक्त पद, अधिकारी वर्गाकडे वाहन नसल्याची कैफियत मांडली होती. याबाबत दखल घेऊन  सवरा यांनी खासदार अजूनही विरोधी पक्षामध्ये असल्याप्रमाणे वागत असल्याचे त्रिमय काढला. खासदारांनी सत्ताधारी पक्षातून निवडणूक आल्याचे त्यांच्या लक्षात आणून देत आपल्या मतदार संघातील समस्या ‘तेथे’ (सांगून दिल्लीकडे बोट दाखवून) मांडायच्या असे सांगताच सभागृहात एकच हास्य पिकले

सवरा त्यावर न थांबता पुढे असेही म्हणाले की, ‘पालघर जिल्ह्याची निर्मिती राजेंद्र गावीत यांनी केली व नंतर (विधानसभा निवडणुकीनंतर) हा जिल्हा माझ्याकडे सुपूर्द केला. मला  हा जिल्हा चालविता येईल की नाही अशी शंका त्यांना बहुधा असावी. म्हणून ते कालांतराने माझ्यासोबत (भाजपामध्ये) आले. पालकमंत्री यांच्या चौफेर फटकेबाजीचा मुड कायम राहिला व आपले मार्गदर्शनपर भाषण संपविताना‘आपण दोघे (खासदार गावीत व ते स्वतः) सत्तेमध्ये राहू अथवा नाही राहणार. पालघरचा विकास झालाच पाहिजे असे सांगितले.

खासदारांच्या विचारांवर लगाम
आपल्या पालकमंत्र्यांच्या कारकिर्दीत खासदार ऍड्. चिंतामण वनगा यांनी जिल्हा नियोजन बैठकीसह विविध आढावा बैठकींमध्ये आपल्या मतदार संघातील विचार सुस्पष्ट पणे मांडण्याचा प्रयत्न केला. या सर्व बैठकांमध्ये खासदार साहेब असल्याने विरोधकांची गरजच नाही असेही बोलले जायचे. दिवंगत खासदार वनगा यांच्या पावलावर पाऊल ठेवत खासदार गावीत यांनी त्याच धर्तीवर आपली नवी ‘इनिंग सुरू करीत असल्याचे पाहून पालकमंत्री यांनी आपल्या या कारकिर्दीतील शेवटचे वर्ष सहजगत जावे म्हणून गावीत यांना जाहीर प्रेमाचा सल्ला (डोस) दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे.
 

संबंधित लेख