chandrashekhar ghule | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

चंद्रशेखर घुले मारणार एका दगडात दोन पक्षी! 

मुरलीधर कराळे 
बुधवार, 26 जुलै 2017

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने जिल्ह्यात मोठे फेरबदल करण्याचे सुतोवाच केले असताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी आपली खुर्ची वाचविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. आपले पद सांभाळायचे, तसेच आगामी विधानसभेची तयारी करण्याचा भाग म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे नियोजन त्यांनी केले आहे. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न आहे. 

नगर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने जिल्ह्यात मोठे फेरबदल करण्याचे सुतोवाच केले असताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी आपली खुर्ची वाचविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. आपले पद सांभाळायचे, तसेच आगामी विधानसभेची तयारी करण्याचा भाग म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे नियोजन त्यांनी केले आहे. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न आहे. 

माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांचा गौरव पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे. या वेळी अभंग यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार यांचा जिल्ह्यात भव्य सत्कार होणार आहे. हे नियोजन राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केले आहे. कार्यक्रम भव्य होण्यासाठी घुले यांनी सर्वच कार्यकर्ते कामाला लावले आहेत. 

जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे आलेली मरगळ झटकण्यासाठी पक्षाने जोरदार प्रयत्न सुरू केले. त्याचाच भाग म्हणून कार्यकर्त्यांची पुर्नंबांधणी करण्याचे नियोजन केले. मध्यंतरी युवा नेते सुजीत झावरे यांची जिल्हाध्यक्षपदासाठी फिल्डींग होती. मात्र नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला व चंद्रशेखर घुले यांना अभय दिले. त्यामुळे पक्षातील मरगळ झटकण्यासाठी घुले कामाला लागले आहेत. बहुतेक ठिकाणचे पदाधिकारी बदलण्यात येत आहेत. तसेच नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याचे नियोजन सुरू आहे. 
विधानसभेची तयारी 
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचा मोठा विरोधक म्हणजे गडाख कुटुंबिय. तालुक्‍यात प्रस्त असलेल्या या कुटुंबाने शेतकरी क्रांतिकारी पक्ष स्थापण करून आपले स्थान भक्कम असल्याचे दाखवून दिले. त्यांना माळी समाजाची होत असलेली मदत तोडण्याचा घुले यांचा डाव असल्याचे मानले जाते. त्याचाच भाग म्हणून माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन मानले जाते. 

कुकाणे गट हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु तेथे पंचायत समितीला शेतकरी क्रांतिकारी पक्षाचा उमेदवार विजयी झाला. या गटात माळी समाजाची असलेली व्होट बॅंक ही त्याला कारणीभूत होती. मग कुकाणे परिसरातील हा संपूर्ण समाज आपल्याकडे खेचण्यासाठी अभंग यांचा भव्य कार्यक्रम केल्यास आगामी काळात फायदा होऊ शकेल, यासाठी घुले यांनी लक्ष्य केंद्रीत केलेले दिसते. तसेच कुकाणे परिसरातच पक्षाचे चार जिल्हा उपाध्यक्ष, दोन सरचीटणीस तसेच इतर अनेक कार्यकर्त्यांना पदे देऊन खुष ठेवण्याचा प्रयत्न घुले यांनी केलेला आहे. 
 

संबंधित लेख