chandrashekhar bawnkule | Sarkarnama

बावनकुळेंच्या भावाच्या  कंपनीला 170 कोटींचे कंत्राट 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 जुलै 2017

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोराडीतील जगदंबा कन्स्ट्रक्‍शनवर नागपूर महापालिका उदार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भावाच्या जगदंबा कन्स्ट्रक्‍शनला 170 कोटी रुपयांचे डांबरी रस्ते तयार करण्याचे कंत्राट दिले आहे. 

नागपूर शहरात सर्वत्र सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असताना स्थायी समितीने शहरात डांबरी रस्त्यांमध्ये हात धुण्याचा कार्यक्रम आखला आहे. यासाठी केवळ चारच निविदा आल्या. या "जगदंबा'ची निविदा सर्वांत कमी दराची असल्याने या कंपनीला 170 कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला. पालकमंत्री बावनकुळे यांचे बंधू नंदकिशोर यांची कंपनी असल्याने या कामाला विनासायास मंजुरी मिळाली. शहराच्या विकासासाठी या कंपनीला काम देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी केला. 
 
संबंधित लेख