chandrapur politics | Sarkarnama

उन्हामुळे मतदानाच्या वेळेत वाढ 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 एप्रिल 2017

विदर्भात सध्या उष्णतेची लाट असून याचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसू नये, यासाठी मतदानाची वेळ एका तासाने वाढविण्यात आली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 

नागपूर : विदर्भात सध्या उष्णतेची लाट असून याचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसू नये, यासाठी मतदानाची वेळ एका तासाने वाढविण्यात आली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 

चंद्रपूर महापालिकेची उद्या (ता. 19) निवडणूक होणार आहे. चंद्रपूरचे आजचे कमाल तापमान 46 अंश सेल्सिअस एवढे होते. विदर्भात सर्वांत अधिक तापमानाचे शहर म्हणून चंद्रपूरची नोंद झाली. विदर्भात सध्या सकाळी 10 वाजेपासून उन्हाच्या झळा सुरू होतात. या त्रासामुळे चंद्रपुरातील मतदार दुपारी मतदान केंद्रांकडे मतदार फिरकणार नाही, अशी शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने मतदानाच्या वेळेत एक तासाने वाढ केली आहे. मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत होते. आता सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 
 

संबंधित लेख