chandrapur-corporation-maratha-reservation | Sarkarnama

चंद्रपूर महापालिका : मराठा आरक्षणाचे आमसभेत पडसाद

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 जुलै 2018

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. मंगळवारी (ता. 31) चंद्रपूर महापालिकेच्या आमसभेत या मागणीचे पडसाद उमटले. 

चंद्रपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. मंगळवारी (ता. 31) चंद्रपूर महापालिकेच्या आमसभेत या मागणीचे पडसाद उमटले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व बसप नगरसेवकांनी सभागृहात फलक दाखवून आरक्षण लागू करण्याची मागणी केली.

सकल मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात तब्बल 58 मोर्चे काढले. शांततामय मार्गाने निघालेल्या मोर्चाची दखल घेण्यात आली. मात्र, नंतरच्या काळात शासनाने या निर्णयासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे मराठा समाजातर्फे पुन्हा त्याच मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचे लोण पसरले आहे. त्यातून चंद्रपूर महापालिका सुटलेली नाही.

महानगरपालिकेच्या आमसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक जयस्वाल, बहुजन समाज पक्षाचे गटनेता अनिल रामटेके, नगरसेवक प्रदीप डे व अन्य नगरसेवकांनी सभागृहात मराठा आरक्षण देण्याची मागणी केली. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी फलक उंचावून या मागणीला समर्थन जाहीर केले. 

संबंधित लेख