चंद्रपुरात भाजप नगरसेवकांमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमध्ये नगरसेविका छबुताई वैरागडे यांचे नाव माजी महापौर तथा नगरसेविका राखी कंचर्लावार यांच्या पुढाकारातून समोर आले. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा आमदार नाना श्‍यामकुळे यांनीसुद्धा या नावाला होकार दर्शविला होता. मात्र, महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी वैरागडे यांच्या नावाला विरोध केला.
चंद्रपुरात भाजप नगरसेवकांमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

चंद्रपूर : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमध्ये नगरसेविका छबुताई वैरागडे यांचे नाव माजी महापौर तथा नगरसेविका राखी कंचर्लावार यांच्या पुढाकारातून समोर आले. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा आमदार नाना श्‍यामकुळे यांनीसुद्धा या नावाला होकार दर्शविला होता. मात्र, महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी वैरागडे यांच्या नावाला विरोध केला. 

अखेर विशेष सभेत सर्व सदस्यांची नावे जाहीर करण्यात
आल्यानंतर शेवटच्या क्षणी वैरागडेंना समितीत स्थान देण्यात आले. विशेष म्हणजे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या सर्व प्रकाराची तक्रार कंचर्लावार यांनी केल्याचे समजते.

महिला व बालकल्याण समिती सदस्यांची नावे निर्धारित करण्यासाठी काल महापालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या समितीत मर्जीतील नगरसेवकांना समाविष्ट करण्यासाठी दोन-चार दिवसांपासून "लॉबिंग' सुरू झाली. राखी कंचर्लावार यांनी जटपुरा प्रभागाच्या नगरसेविका छबूताई वैरागडे यांचे नाव समितीत समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला. गटनेता वसंता देशमुख यांच्याकडे मागणीसुद्धा केली. तसेच आमदार नाना श्‍यामकुळे यांची भेट घेऊन वैरागडे यांचे नाव घेण्याची विनंती केली होती. 

आमदार श्‍यामकुळेंनीसुद्धा वैरागडेंच्या नावाला होकार दर्शविला.
वैरागडे यांचे नाव समितीत येणार असल्याची कुणकूण लागली. त्यानंतर महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी वैरागडे यांच्या नावाला विरोध केला. विशेष सभेत भाजपच्या वाट्याला आलेल्या आठ सदस्यांपैकी सात सदस्यांची नावेही जाहीर करण्यात आली. त्यात वैरागडे यांचे नाव नव्हते. मात्र, ऐनवेळी वैरागडे यांचे नाव समितीत समाविष्ट करण्यात आले. या निमित्ताने मनपातील भाजप नगरसेवकांमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला. 

भाजप शहराध्यक्ष आमदार नाना श्‍यामकुळे यांच्या होकारानंतरही पदाधिकाऱ्यांकडून वैरागडेंचे नाव वगळण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे राखी कंचर्लावार यांनी या सर्व प्रकाराची तक्रार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केल्याचे समजते. बैठकीला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल
फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे यांच्यासह गटनेते, सर्व पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. भाजपकडून शीतल गुरनुले, चंद्रकला सोयाम, आशा आबोजवार, वंदना जांभूळकर, शीतल आत्राम, संगीता खांडेकर, ज्योती गेडाम, छबूताई वैरागडे, बसपकडून पुष्पा मून, कॉंग्रेसकडून ललिता रेवल्लीवार, संगीता भोयर, तर नगरविकास आघाडीकडून मंगला आखरे यांची नावे समितीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com