chandrapur | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

उन्हामुळे चंद्रपूरमध्ये मतदानावर परिणाम?

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 17 एप्रिल 2017

 

 

नागपूर  : चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी संपणार असून उन्हाने त्रस्त झालेल्या कार्यकर्त्यांपुढे मतदानासाठी मतदारांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे. येत्या 19 एप्रिलला महापालिकेची निवडणूक होणार आहे. एकूण 17 प्रभागातून 66 नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. यात कॉंग्रेस व भाजपमध्ये खरी लढत होणार असून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस काही भागात आपले अस्तित्व दाखविण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जाहीर सभा घेऊन भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार केला तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही चंद्रपुरात जाहीरसभा घेऊन कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. प्रचाराचा धुराळा आज थांबणार आहे. 
विदर्भात सध्या उष्णतेची लाट सुरू असून हवामान विभागाच्या माहितीनुसार ही लाट आणखी तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. सध्या चंद्रपूरमध्ये 45 अंश सेल्शियस तापमान कायम राहत आहे. एवढ्या तापमानात मतदारांना मतदानासाठी बाहेर काढणे हीच मोठे आव्हान राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपुढे राहणार आहे. उन्हामुळे सकाळच्या सत्रात अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन अनेक राजकीय पक्षांनी मतदारांना केले आहे. 

संबंधित लेख