chandrakantdada supports jayaji surywanshi | Sarkarnama

जयाजीचा गावोगावी सत्कार करायला हवा : चंद्रकांतदादा 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जून 2017

: "जयाजीला व्हिलन ठरवू नका, खरे तर जयाजीचा गावोगावी सत्कार करायला हवा,'' अशा शब्दांत भाजपचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांची पाठराखण केली. 

कोल्हापूर : "जयाजीला व्हिलन ठरवू नका, खरे तर जयाजीचा गावोगावी सत्कार करायला हवा,'' अशा शब्दांत भाजपचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांची पाठराखण केली. 

जयाजीराव सूर्यवंशी यांच्या संघटनेशी झालेल्या चर्चेनंतर पहाटे पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करण्यात आल्याने आज जयाजीराव सूर्यवंशी यांना सर्वत्र व्हिलन म्हणून पाहिले जात आहे. आधीच्या आणि नंतरच्या बैठकीत फरक काय? अशी विचारणा केली असता चंद्रकांतदादा म्हणाले, ""जयाजीला व्हिलन ठरविण्याची काहीच गरज नाही. उलट जयाजीचा गावोगावी सत्कार झाला पाहिजे. जयाजी सूर्यवंशी आणि पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी केलेल्या संपाची दखल सरकारला घ्यावी लागली. शेतकरी संपापूर्वी अनेक नेत्यांनी आणि पक्षांनी वेगवेगळ्या यात्रा काढल्या पण त्याचा काही परिणाम झाला नाही.

पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल मात्र घ्यावी लागली. जयाजी सूर्यवंशी आणि त्यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळाच्या चर्चेत पाच एकर जमिनीचे मालक असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलेली होती. नंतरच्या बैठकीत 35 शेतकरी संघटनांशी झालेल्या चर्चेत निकषावर सरसकट कर्जमाफीचा निर्णय झाला. त्यामुळे आपल्याला असे म्हणता येईल की, जयाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकूण कर्जमाफीचा पाया रचला तर इतर संघटनांनी दुसऱ्या बैठकीत त्यावर कळस चढविला.'' 

संबंधित लेख