chandrakantdada patil on uddhav thakare | Sarkarnama

"मध्यावधी'ची तुमची इच्छा तर आमची तयारी : चंद्रकांतदादा 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जून 2017

मध्यावधी निवडणुकांबाबत भाजपने पुढाकार घेतलेला नाही. पण तुमची इच्छा असेल तर आमची तयारी आहे, अशा शब्दांत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेचे नाव न घेता टोला लगावला. 

कोल्हापूर : मध्यावधी निवडणुकांबाबत भाजपने पुढाकार घेतलेला नाही. पण तुमची इच्छा असेल तर आमची तयारी आहे, अशा शब्दांत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेचे नाव न घेता टोला लगावला. 

चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी दैनिक सकाळच्या कोल्हापूर कार्यालयास भेट दिली. त्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून चंद्रकांतदादांनी "सकाळ'च्या सर्व आवृत्त्यांच्या संपादकांशी संवाद साधला आणि विविध प्रश्‍नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली. 

मध्यावधी निवडणुकीसाठी भाजप तयार आहे, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ""राज्य सरकार अतिशय स्थीर आहे. जेथे अस्थिरता असते, तेथे मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात. विरोधी पक्षांकडून आधी मध्यावधींची निवडणुकांची भाषा करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भाजप या निवडणुकीसाठी तयार आहे, असे प्रतिक्रियात्मक विधान केले. आमचा पक्ष कोणत्याही निवडणुकीसाठी तयारच असतो. '' 

उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीवरुन पुन्हा आक्रमक विधाने करण्यास सुरवात केली आहे, याकडे लक्ष वेधले असता चंद्रकांतदादा म्हणाले, मी त्यांना कालच त्यांच्या घरी जावून भेटलो. आता कर्जमुक्‍तीचा निर्णय झालेलाच आहे, त्यामुळे कर्जमुक्‍ती करा हे पुन्हा मांडण्याची गरज नाही. आता कर्जमुक्‍तीचे स्वरुप कसे असावे, हेच ठरवायचेँ आहे. त्यामुळे तुम्ही आता आंदोलन करण्याची गरज नाही, असे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. त्यामुळे आता त्यांनी कर्जमुक्‍तीचे स्वरुप ठरविण्यात अधिक सहभाग घेतला पाहिजे. 

संबंधित लेख