chandrakantdada patil about maratha reservation in vidhansabha | Sarkarnama

चंद्रकांतदादा म्हणाले, ''अजित पवार बरोबर आहेत, तर विखे पाटील चूक''!  

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

विखे पाटील आणि अजित पवार यांच्यात मतभिन्नत्ता असल्याचे स्पष्ट झाले.

पुणे : मराठा आरक्षणाचा अहवाल विधीमंडळाच्या पटलावर मांडण्यावरुन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात मतभिन्नत्ता असल्याचे स्पष्ट झाले.

यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांची भूमिका बरोबर तर विखेंची भूमिका चुकीची असल्याचे सांगितले. 

विधानसभेत अजित पवारांनी चर्चा करताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्‍का न लागता मराठा आरक्षण द्यावे, अशी भूमिका मांडली. पटलावर अहवाल मांडला गेलातर लगेच त्याविरूद्ध कोर्टात जाण्याची काहींची भूमिका आहे. काही लोकांना मराठा आरक्षण होवू नये, असे वाटते आहे. त्यामुळे शासनाने घटनात्मक अडचणी निर्माण होणार असतील तर अहवाल पटलावर ठेवू नये, असे अजित पवार म्हणाले. 

विखे पाटलांनी अहवाल पटलावर ठेवण्याची जोरदार मागणी केली. अहवाल पटलावर ठेवून चर्चा करण्याला सरकार घाबरत आहे. सरकार गंभीर नाही, अशी टीका विखे पाटील यांनी केली. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांची भूमिका बरोबर तर विखेंची भूमिका चुकीची असल्याचे सांगितले. 
 

संबंधित लेख