chandrakantdada absent marteyr funeral | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

चंद्रकांतदादांनी शहिद धनावडेंच्या गावी जाणे टाळले! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

सातारा जिल्हयाच्या दौऱ्यावर असूनही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहिद रवींद्र धनावडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी जाणे टाळले. पालकमंत्री विजय शिवतारे त्या ठिकाणी असल्याने महसूल मंत्र्यांनी मोहोटला जाणे टाळल्याचे भाजपचे पदाधिकारी सांगत आहेत.

सातारा : सातारा जिल्हयाच्या दौऱ्यावर असूनही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहिद रवींद्र धनावडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी जाणे टाळले. पालकमंत्री विजय शिवतारे त्या ठिकाणी असल्याने महसूल मंत्र्यांनी मोहोटला जाणे टाळल्याचे भाजपचे पदाधिकारी सांगत आहेत. महाबळेश्‍वरच्या कार्यक्रमानंतर त्यांच्याकडे मोहाटला जाण्यास वेळ होता. मात्र पालकमंत्री असताना दुसऱ्या मंत्र्यांनी जाण्याचे कारण नाही, अशी भूमिका घेत जाणे टाळण्यात आले. 

चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबळेश्वर, कोरेगाव आणि सातारा या तीन तालुक्‍यात कार्यक्रम होते. महाबळेश्वर येथील कार्यक्रम संपल्यानंतर कोरेगाव तालुक्‍यातील जळगाव येथील कार्यक्रमास जाण्यासाठी दादा निघाले. त्याच दरम्यान, मोहाट (ता. जावली) येथील शाहिद जवान रवींद्र धनावडे यांचे पार्थिव मेढ्याकडे येत होते. पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सर्व आमदारांसह खासदार उदयनराजे भोसले मोहाटमध्ये शहिद धनावडे यांच्या पार्थिवाची वाट पाहत थांबले होते. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून त्यांनी मोहाटला जायला हवे होते. पण तसे न होता ते हिवरे येथील कार्यक्रमासाठी निघून गेले. जाताना त्यांनी पालकमंत्री शिवतारे व जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून शहिद जवान धनावडे यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी शासन घेणार असल्याचे सांगितले. 

संबंधित लेख