चंद्रकांत पाटील एका म्यानात दोनच काय पाच तलवारीही बसवू शकतात! 

कोणीही काळजी करू नये, असे सांगून अतुल भोसले यांनी सर्व उपस्थितांना बुचकळ्यात टाकले.
चंद्रकांत पाटील एका म्यानात दोनच काय पाच तलवारीही बसवू शकतात! 

सातारा : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात यापूर्वीच भाजपकडून मनोज घोरपडे यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अशातच येथील कॉंग्रेसचे नेते धैर्यशिल कदम यांच्यासाठी भाजपने पायघड्या घातल्या आहेत. श्री. कदमही याच मतदारसंघातून इच्छुक असल्याने महसूमंत्री चंद्रकांत पाटील कऱ्हाड उत्तरेत एकाच म्यानात दोन तलवारीचा प्रयोग करत असल्याचे चित्र दिसत आहे.  

कऱ्हाड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार आहे. यासह कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात परिवर्तन घडविण्यासाठी भाजपचे नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार बांधणी सुरू केली आहे. मध्यंतरी झालेल्या भाजपच्या कऱ्हाडातील कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले, कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे हे उमेदवार असतील असे स्पष्ट केले आहे. तरीही कऱ्हाड उत्तरमधून इच्छुक असलेले कॉंग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांच्यासाठी भाजपने पायघड्या घातल्या आहेत. 

या मतदारसंघात भाजपकडून एक उमेदवार निश्‍चित असतानाच दुसऱ्या इच्छुकाला पक्षात घेऊन भाजपचे नेते नेमके काय साधणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. नुकतीच धैर्यशील कदम यांच्या वर्धन ऍग्रो या कारखान्यास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, विठ्ठल रूक्‍मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते. 

यावेळी एका म्यानात दोन तलवारी कशा बसणार, असा प्रश्‍न उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पडला होता. तसेच सर्वांनी बोलूनही दाखविले. पण चंद्रकांत पाटील हे एका म्यानात दोनच काय पाच तलवारीही बसवू शकतात. त्यांनी कोल्हापूरात असा प्रयोग केला आहे. त्यामुळे कोणीही काळजी करू नये, असे सांगून अतुल भोसले यांनी सर्व उपस्थितांना बुचकळ्यात टाकले होते. त्यामुळे कऱ्हाड उत्तर मतदारसंघातचंद्रकांत पाटील एकाच म्यानात दोन तलवारींचा प्रयोग करणार हे निश्‍चित झाले आहे. पण मनोज घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केलेली असली तरी धैर्यशील कदमांसाठी काही तरी नियोजन केले असणार याचीच उत्सुकता या मतदारसंघात आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com