chandrakant patil wishe to eknath khadase | Sarkarnama

नाथाभाऊंना चंद्रकातदादांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचीच उत्सुकता ! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 सप्टेंबर 2018

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना महसूलमंत्री व जिह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुक्ताईनगरात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. त्यामुळे पाटीलांनी नेमका काय संदेश दिला याबाबत आता चर्चाही सुरू झाली आहे. 

खडसे यांचा आज वाढदिवस. मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून प्रचंड गर्दी आहे. मंत्री पाटील यांनीही सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी चर्चाही केली. "बेटी बचाओ-बेटी पढाओ' अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, आमदार संजय सावकारे, आमदार हरिभाऊ जावळे यावेळी उपस्थित होते. 

चंद्रकांतदादांनीखडसेंना शुभेच्छा देतानाच त्यांच्याशी चर्चा केली, त्यात नेमका काय "शुभेच्छा संदेश' दिला याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

खडसेंच्या निवासस्थानी गर्दी 
भाजपचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्याकडे कोणतेही पद नाही.मात्र त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळी सात वाजेपासूनच त्यामुळे मुक्ताईनगरातील "मुक्ताई'निवासस्थानी गर्दी होती. विशेष म्हणजे राजकीय नेते कार्यकर्त्यासह सर्वसामान्य नागरिकांचीही संख्या अधिक होती. 
 
संबंधित लेख