महाडिकांना उमेदवारी देणार का? चंद्रकांतदादांनी काढली मुश्रीफांची विकेट !

राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्यातील सख्य संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. शक्‍य असेल तेव्हा आ. मुश्रीफ हे खा. महाडिक यांच्यावर आपल्या मिश्‍कील भाषेत टिप्पणी करतात. आज झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतही आ. मुश्रीफ यांनी ही संधी सोडली नाही. मात्र पालकमंत्र्यांच्या गुगलीने आज आ. मुश्रीफांची विकेट निघाली.
महाडिकांना उमेदवारी देणार का? चंद्रकांतदादांनी काढली मुश्रीफांची विकेट !

कोल्हापूर : जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आज चांगलीच टोलेबाजी रंगली. खासदार धनंजय महाडिक यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबददल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार, असा उल्लेख सभागृहातूनच आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. यावर असा उल्लेख करण्यास काही हरकत नाही, पण त्यांना लोकसभेची उमेदवारी देणार आहात का, असा प्रश्‍न करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ. मुश्रीफ यांची विकेट काढली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संसदरत्न पुरस्काराबददल खासदार महाडिक यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. ठराव मांडताच सभागृहात पहिल्या ओळीत बसलेले राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे खासदार, असा उल्लेख करावा,अशी खोचक टिप्पणी केली. त्यांची ही टिप्पणी पालकमंत्र्यांच्या तडाख्यातून सुटली असती तरच नवल. क्षणाचाही विलंब न लावता पालकमंत्री पाटील यांनी, 'तुम्ही महाडिक यांना लोकसभेची उमेदवारी देणार आहात का' असा सवाल करत आमदार मुश्रीफांची विकेट काढली. पालकमंत्र्यांच्या या उत्तरावर आमदार मुश्रीफ यांच्यासह सभागृहाने हसून दाद दिली. 

नियोजन मंडळाचे कामकाज सुरु असतानाच भावनिक झालेल्या एका कार्यकर्त्याने मध्येच उठून दादांना मुख्यमंत्री पदाचा कार्यभार मिळाल्याबददल शुभेच्छा दिल्या. मात्र हा चार्ज कालच परत दिल्याचा खुलासा मंत्री पाटील यांनी केला. यावर मुख्यमंत्री होण्यासाठीच दादांना शुभेच्छा द्या, असा सल्ला आमदार मुश्रीफ यांनी दिला. यावर तुमचा यासाठी पाठिंबा आहे का? असा प्रश्‍न मंत्री पाटील यांनी मुश्रीफांना केला असता त्यांनी होकार दिला. यावर मला पाठिंबा देण्यापूर्वी पवार साहेबांना विचारा, असा टोला मंत्री पाटील यांनी लगावताच सभागृहात पुन्हा एकदा जोराचा हशा पिकला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com