chandrakant patil prevent sadabhu talking to media | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

मिडीयाशी बोलणाऱ्या सदाभाऊंना चंद्रकांतदादांनी रोखले!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

अखेर मंत्री पाटील यांनी सदाभाऊ खोत याना नेण्याचे कारण काय?

कोल्हापूर : आज एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांच्या विनंती वरून बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पालकमंत्र्यानी चाणाक्षपणे रोखले. त्यांना दंडाला धरून बाहेर नेले.अर्थात हा सर्व प्रकार नकळत घडल्याने याची चांगलीच चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी रंगली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'नव ऊर्जा' या महोत्सवाचे उद्घाटन आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांनी मंत्री पाटील यांना मराठा आरक्षण, विनायक मेटे यांचे शिवस्मारकाचे भूमिपूजन, एफआरपी अशा मुद्द्यांवर प्रतिक्रिया विचारली.

प्रतिक्रिया देऊन जात असतानाच मागे असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना प्रसारमाध्यमांनी रोखत थकित एसआरपी, कांद्याला दोन रुपयांचे दिलेले अनुदान यावर विचारण्यासाठी रोखले. मात्र ही बाब प्रतिक्रिया देऊन पुढे गेलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आली. पुढे गेलेले मंत्री पाटील लगेच मागे फिरले आणि त्यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांना पुढे घालून नेले. 

मंत्री पाटील यांनी ज्याप्रमाणे खोत यांना नेले, त्याची कार्यक्रमस्थळी जोरदार चर्चा होती. अखेर मंत्री पाटील यांनी सदाभाऊ खोत याना नेण्याचे कारण काय, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती.

संबंधित लेख