chandrakant patil pc about maratha reservation | Sarkarnama

मंत्र्यांच्या गाड्या फोडून जर आरक्षण मिळणार असेल गाड्या फोडा : चंद्रकांत पाटील 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

पुणे : मंत्र्यांच्या गाड्या फोडून जर आरक्षण मिळणार असेल तर फोडा गाड्या असे सांगतानाच पंढरपुरात मुख्यमंत्री गेले असते पाच पंचवीस लोक मृत्युमुखी पडले असते. तेथे साप सोडण्यात येणार होते. याची माहिती सरकाररकडे होती. वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली त्यामुळेच ते आषाढीच्या पुजेला गेले नाहीत असा दावा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 

मराठवाड्यातील गंगापूर तालुक्‍यात काकासाहेब शिंदे या मराठा समाजातील तरूणाने गोदावरी नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याने राज्यभर समाजाच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. आज दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी आंदोलन करण्याबरोबरच काही हिंसक घटना घडल्या आहेत. काकासाहेबांपाठोपाठ आणखी दोघांनी मराठा आरक्षण मिळावे यासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 

या सर्व पार्श्‍वभूमी चंद्रकात पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, की आरक्षणाचा मुद्दा न्याप्रविष्ठ आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचीच सरकारचीच भूमिका आहे. मात्र जाळपोळ आणि आंदोलन करून आरक्षण कसे मिळेल. जर मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळेत असेल तर गाड्या फोडा. मंत्र्यांना रोखून त्यांच्या गाड्या अडवून काहीही होणार नाही. पंढरपुरात चार लाख वारकरी अडकले आहेत. ते आपल्या गावी कसे परततील हे पाहणेही गरजचे आहे. 

मराठा समाजाने आजपर्यंत जे मोर्चे काढले आहेत ते शांततेचे होते. मराठा समाजाने शांत राहुन आरक्षणाचा मुद्दा समजावून घ्यावा. हिंसक घटनांनी काहीही साथ्य होणार नाही. सरकारने मराठा समाजासाठी काही महत्त्वाचे निर्णयही घेतले आहे याकडेही चंद्रकांत पाटील यांनी लक्ष वेधले. 

संबंधित लेख