chandrakant patil, munna mahadik, kolhapur | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

दादा नंबर एकच्या स्पर्धेत 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 ऑगस्ट 2017

कोल्हापूर ः "दादा आता राज्यातील दोन नंबरच्या नव्हे, तर एक नंबर पदाच्या शर्यतीत आहेत,' या शब्दात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर उधळलेली स्तुतिसुमने आणि "महाडिक यांना खूप चांगले भवितव्य आहे,' असे पालकमंत्र्यांनी केलेले सूचक विधान यांमुळे तंबाखू संघाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात आज चांगलीच रंगत आणली. 

कोल्हापूर ः "दादा आता राज्यातील दोन नंबरच्या नव्हे, तर एक नंबर पदाच्या शर्यतीत आहेत,' या शब्दात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर उधळलेली स्तुतिसुमने आणि "महाडिक यांना खूप चांगले भवितव्य आहे,' असे पालकमंत्र्यांनी केलेले सूचक विधान यांमुळे तंबाखू संघाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात आज चांगलीच रंगत आणली. 

येथील शाहू स्मारक भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. "2004 च्या लोकसभा निवडणुकीत रात्रीत जादू झाली आणि महाडिक पराभूत झाले. नंतर त्यांच्या पेट्रोल पंपावर धाडी घातल्या गेल्या. माणसं आत गेली, तरीही ते दगाबाजीला घाबरले नाहीत,' अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी त्यांचे कौतुक केले. जिल्ह्यात काही व्यक्ती टोपणनावाने परिचित आहेत. त्यात तंबाखू संघाचे एस. के. आणि अप्पा अर्थात महादेवराव महाडिक यांचा समावेश असल्याचे पाटील यांनी सांगितले. एस. के. आणि अप्पांनी लोकांना जेवढा आनंद देता येईल, तेवढा दिला, असेही त्यांनी नमूद केले. 

खासदार महाडिक यांनी भाषणाच्या सुरवातीलाच चंद्रकांतदादा आता दोन नव्हे, तर एक नंबरच्या नंबरात (मुख्यमंत्री होण्याचा क्रमांक) असल्याचे सांगितले. पाटील 2004 मध्ये पराभूत झाले. त्यानंतर मात्र धान्य बॅंक तसेच युवा शक्तीच्या माध्यमातून ते कार्यरत राहिले. नंतर पेट्रोल पंपावर धाडी टाकल्या, माणसं आत घातली. दगाबाजीला ते घाबरले नाहीत. 2009 मध्ये थांबावे लागले; मात्र 2014 ला ते निवडून आले. डॉ. संजय पाटील यांनी दबकून न जाता संघर्ष सुरू ठेवावा, असे आवाहनही पाटील यांनी केले. 

आमदार सुरेश हाळवणकर यांनी भाषणात टोलेबाजी करत कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयरामबापू यांच्याकडे पाहत, "बापू, ही जोडी का फुटली?' असा सवाल करताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या. खासदार महाडिक यांच्यामागे महादेवराव महाडिक यांची ताकद आहे. मौनी बाबा ही ओळख त्यांनी पुसून काढली आहे. महाडिकांचा तिसरा डोळा त्यांच्या कामी आला. डॉ. संजय पाटील यांच्याबाबतही असाच अनेकांनी डोळा उघडला आणि त्यांच्यावर राजकीय वक्रदृष्टी झाली. वेळीच डॉ. पाटील यांना हवामानाची दिशा समजली आणि त्यांनी तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. 
 

संबंधित लेख