Chandrakant patil meets Udhhav thakre | Sarkarnama

चंद्रकांत दादांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट ; अखेर कर्जमुक्तीवर सूर जुळले

सुचिता रहाटे : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जून 2017

शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांशी यासंबंधी चर्चा करून निर्णय करून शिवसेनेची भुमिका मांडू. असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुंबई : शेतकऱ्यांची 'कर्जमाफी' नको, तर 'कर्जमुक्ती' करूया, या निर्णयावर अखेर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात एकमत झाले आहे. शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, मात्र तो सक्षमही व्हायला हवा. हा मुद्दा सुद्धा उद्धव ठाकरेंना पटला आहे. 

त्यामुळे मित्रपक्ष म्हणवणाऱ्या शिवसेना, भाजप आज खऱ्या अर्थाने 'मित्रासारखे' वागले. आज मातोश्री बंगल्यावर चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख व परिवहन मंत्री दिवाकर रावते असे शिवसेनेचे नेतेमंडळीही उपस्थित होते.

शेतकरी कर्जमुक्त व्हायलाच हवा मात्र त्यासोबत राज्याचं आर्थिक स्थैर्य अबाधित रहायला हवं. शिवसेना भाजपने एकत्रितपणे समानव्यायाने हा मुद्दा सोडवू, यावरही शिक्कामोर्तब झाले. परंतु शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांशी यासंबंधी चर्चा करून निर्णय करून शिवसेनेची भुमिका मांडू. असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सरसकट कर्जमाफी त्याचबरोबर सातबारा कोरा व्हावा या मागणीवर शिवसेना अजूनही ठाम असून शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान होईल, याची काळजी शिवसेना घेईल. कोणतेही पाऊल उचलण्याआधी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करू. असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.

संबंधित लेख