Chandrakant Patil & Mahadiks | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

 महाभारतातील अर्जुनाप्रमाणे मला आणि महाडिकांना  धनंजय यांच्याविरुद्ध लढावे लागणार

डॅनियल काळे :   सरकारनामा 
शुक्रवार, 15 मार्च 2019

महाभारतात श्रीकृष्णाने अर्जूनाची ही कोंडी सोडविली आणि धर्मासाठी लढ असे अर्जूनाला सांगितले होते . आम्हा तिघांनाही आता ही व्दिधा स्थिती सोडून तेच करावे लागणार आहे.

कोल्हापूर :  महाभारतामध्ये स्वकीयांशाची युध्द करताना अर्जूनाची जी अवस्था झाली,तीच अवस्था माझी,जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडीक आणि आमदार अमंल महाडीक अशा तिघांची झाली आहे. 

महाभारतात श्रीकृष्णाने अर्जूनाची ही कोंडी सोडविली आणि धर्मासाठी लढ असे अर्जूनाला सांगितले होते . आम्हा तिघांनाही आता ही व्दिधा स्थिती सोडून तेच करावे लागणार आहे. समोर खासदार धनंजय महाडीक हा परममित्र लढत असताना आम्हालाही युतीधर्मच पाळत प्रा.संजय मंडलिक यांना ताकदीने निवडून आणण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी लढावे लागणार आहे,असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, आयुष्यात खूप कमी वेळा असे अवघड प्रसंग येतात. असे अवघड प्रसंग आम्हा तिघांवर आले आहेत. धनंजय महाडीक हे माझे परममित्र आहेत. अमंल महाडीक यांचे ते भाउ आहेत. तर अध्यक्षा शौमिका महाडीक यांचे ते दीर आहेत. श्री. महाडीक हे राष्ट्रवादीतून लढत आहेत.

आम्ही मात्र भाजपाचे खंदे कार्यकर्ते आहोत, पक्षाला दिशा देणारे आहोत. धनंजय महाडीक समोर असल्याने आमची व्दिधा मनस्थिती होती. पण जे अर्जूनाने केले, तेच आम्हाला करावे लागणार आहे. शेवटी युतीधर्म महत्वाचा आहे. म्हणून आम्ही मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या मागे उभे राहणार आहोत. 
  

संबंधित लेख