चंद्रकांतदादांनी धनंजय महाडिकांशी केली बंद दाराआड चर्चा 

खासदार महाडिक यांचा सत्कार करण्याची वेळ आल्यानंतर ''पहिल्यांदा त्यांना फुले द्या. मतांचे नंतर बघू' ', अशी मार्मिक टिप्पणी पालकमंत्री पाटील यांनी केली.
patil mahadik
patil mahadik

कोल्हापूर:  भाजप नेते  चंद्रकांतदादा पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय  महाडिक यांच्यात रविवारी  बंद खोलीत प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेचा तपशील दोन्ही नेत्यांनी उघड केलेला नाही . 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या कार्यालयाचे उद्‌घाटन येथे रविवारी पालकमंत्री  चंद्रकांतदादा   पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमांनंतर पालकमंत्री पाटील व खासदार महाडिक यांच्यात  बंद दारा आड  चर्चा झाली .  नंतर या चर्चेत महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, सेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव सहभागी झाले होते. 


दरम्यान  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या कार्यालयाचा उद्‌घाटन सोहळा राजकीय टोलेबाजीने रंगला .  टोलेबाजीची सुरुवात खासदार महाडिक यांनीच केली. त्यांनी या कार्यालयात प्रवेश करताच "तुम्हाला शुभेच्छा, जास्तीत जास्त निधी आणा'', असे महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांना सुचवले.

त्यावर पालकमंत्री पाटील यांनी 'शुभेच्छा पवार यांना नाही तर तुम्हालाच'', असा टोला लगावला. त्यानंतर महामंडळाच्या वतीने सर्व प्रमुखांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

खासदार महाडिक यांचा सत्कार करण्याची वेळ आल्यानंतर ''पहिल्यांदा त्यांना फुले द्या. मतांचे नंतर बघू' ', अशी मार्मिक टिप्पणी पालकमंत्री पाटील यांनी केली. पालकमंत्री यांच्या या शेऱ्याने  सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.  

यावर ' समझने वालों को इशारा ही काफी हैं' या खासदार महाडिक यांच्या प्रत्युत्तराने देखील सभागृहात हशा पिकला . 

गेल्या काही दिवसांपासून खासदार महाडिक यांची पालकमंत्री पाटील यांच्याशी वाढलेली जवळीक व त्या अनुषंगाने आज झालेली टोलेबाजी याला मोठे महत्त्व आहे.

लोकसभा निवडणुकीत खासदार महाडिक यांची राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्‍चित आहे. तथापि, पक्षातूनच त्यांना विरोध होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी केलेल्या विधानांमुळे मुळे लोकसभा निवडणुकीत काय होणार, याची एक झलकच आज पाहायला मिळाली. 

महापौर सौ. सरिता मोरे, मंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजी जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com