chandrakant patil cant visit dasara chauk agitaion | Sarkarnama

#MarathaReservation चंद्रकांतदादा दसरा चौकात आले असते तर उद्रेक झाला असता!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील दसरा चौकात येणार असल्याचे समजताच सकल मराठा समाजाच्या आंदोलकांचा आज पाराच चढला. "पेड आंदोलक' म्हणता, मग स्टेजवर येताच कशाला,' असा प्रश्‍न आंदोलकांनी उपस्थित केला. पालकमंत्री चौकात आले, तर उद्रेक होईल, असा इशाराच आंदोलकांनी दिला. पालकमंत्री दुपारी तीन वाजता येणार असे सांगण्यात येत होते. पण, प्रत्यक्षात ते काही चौकात आले नाहीत. 

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात "पेड आंदोलक' असल्याचे वक्तव्य पालकमंत्र्यांनी केले होते. त्याचा राग आंदोलकांच्या मनात असल्याचे दिसून आले. शासकीय यंत्रणेतून पालकमंत्री दुपारी तीन वाजता चौकात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याची माहिती मिळताच त्यांनी पोलिस प्रशासनासमोर आपली बाजू मांडली. आम्ही ""पेड आंदोलक' आहोत, तर आमच्या स्टेजवर येता कशाला,' असा उपरोधिक टोला आंदोलकांनी लगावला. सेनापती कापशीहून दोन हजार मराठा बांधव पायी चौकात येत आहेत. पालकमंत्री जर चौकात आले, तर गोंधळसदृश स्थिती निर्माण होऊ शकते. प्रसंगी उद्रेकही होऊ शकतो, असे त्यांनी पोलिस प्रशासनाला सांगितले. पोलिसांनी ते चौकात येणार नसल्याचे स्पष्ट करत आंदोलकांना शांत केले. 

संबंधित लेख