chandrakant patil and udayn | Sarkarnama

उदयनराजेंनी पक्ष काढल्यास त्याचा राष्ट्रवादीला फटका : चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 जुलै 2017

नगर : खासदार उदयनराजे नवीन पक्ष काढणार, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्यांनी नवा पक्ष काढल्यास भारतीय जनता पक्षाला काहीच फरक पडणार नाही. उलट राष्ट्रवादीला त्याचा मोठा फटका बसेल, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला ते आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. ते म्हणाले, की उदयनराजे यांच्या नवीन पक्षाविषयी सोशल मिडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे. पण त्यांनी पक्ष काढल्यास त्याचा फारसा परिणाम होणार नाही. त्याची चिंता राष्ट्रवादी कॉग्रेसने करावी. 

शिवसेना बाहेर पडणार नाही 
राज्य सरकारमधून शिवसेना बाहेर पडेल, असे वाटत नाही आणि पडलीच, तरी भाजपच्या सरकारवर त्याचा बिलकूल परिणाम होणार नाही. आम्ही तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे आणखी दोन वर्षे पूर्ण करू. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानामुळे आता पुढील चिंता नाही. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, या चर्चेचा उपयोग नाही, असे पाटील यांनी सांगितले. 

संबंधित लेख