chandrakant patil and pune | Sarkarnama

चंद्रकांतदादा ; तुम्हाला निवडणूक लढवावीच लागेल, पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा आग्रह

उमेश घोंगडे
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

पुणे : निवडणूक न लढविण्याचा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निर्णय अनपेक्षित आहे. मात्र त्यांना तसे करता येणार नाही. त्यांना निवडणूक लढवावी लागेल. चंद्रकांतदादा पाटील हे पक्षाचे शिस्तबद्ध नेते आहेत. त्यामुळे शेवटी पक्षाने सांगितल्यानंतर त्यांना निवडणूक लढवावीच लागेल, असे मत पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी आज व्यक्त केले. 

कोल्हापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना महसूमंत्री पाटील यांनी पदवीधरच काय कोणतीच निवडणूक यापुढे न लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. पाटील यांच्या निर्णयाने पक्षात खळबळ उडाली. राज्य मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर पाटील यांचे स्थान आहे. पक्षनेतृत्वाचा पाटील यांच्यावर कमालीचा विश्‍वास आहे. या पार्श्‍वभूमीवर पाटील यांनी जाहीर केलेला निर्णय सर्वांनाच आश्‍चर्यचकित करणारा होता. या संदर्भात पक्षातूनही प्रतिक्रिया उमटली. पक्षाने सांगितल्यानंतर पाटील यांना उमेदवारी टाळता येणार नाही, असे मत बहुतेकांनी व्यक्त केले. 

या संदर्भात बोलताना पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, "" महसूलमंत्री पाटील हे पक्षातील जुने जाणते नेते आहेत. मंत्री म्हणून त्यांचे कामदेखील उत्तम आहे. त्यामुळे त्यांचे मत काहीही असले तरी पक्षाचा आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा आग्रह त्यांना टाळता येणार नाही. त्यांना निवडणूक लढवावी लागेल.'' शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनीदेखील हीच भूमिका मांडली आहे. पाटील हे पक्षाचे राज्यातील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे निवडणूक न लढविण्याची भूमिका त्यांनी मांडली असली तरी त्यांना एकट्याला ते ठरविता येणार नाही.पक्ष आणि कार्यकर्त्यांचा आग्रह पाटील मोडू शकणार नाहीत. निवडणूक कुठून लढवायची याचा निर्णय पक्ष घेईल. मात्र त्यांना निवडणूक लढवावी लागेल. पुणे महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनीदेखील चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आदर व्यक्त करीत पाटील यांच्यासारखे नेतृत्व सत्तेत हवे आहे, असे सांगितले. 

संबंधित लेख