chandrakant patil about maratha reservaion in kolhapur | Sarkarnama

#MarathaReservation आरक्षणासाठी सरकार बांधिल: चंद्रकांत पाटील 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कोल्हापूर : "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, सरकार त्यासाठी बांधिल आहे. त्याबरोबरच मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी निम्मे शुल्क भरून प्रवेश, जिल्हास्तरावर वसतिगृहे आणि तरुण-तरुणींसाठी 10 लाखांपर्यंतची बिनव्याजी कर्ज योजना अशा तीन पूरक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल,'' अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केली. 

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यातील पहिल्याच डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाचे उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते आज झाले. ""मराठा समाजातील तरुण-तरुणींना विविध व्यवसाय-उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जास सरकारने हमी दिली आहे. या कर्जाचे व्याज सरकार भरणार आहे.'' 

बॅंकांमार्फत तत्काळ कर्ज उपलब्ध होईल. 12 हजार तरुणांनी अर्ज भरले असून, पाचशे तरुणांना कर्ज उपलब्ध झाले आहे. उर्वरित तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्याची सूचना बॅंकांना दिली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी येत्या महिन्यात 10 जिल्ह्यांत वसतिगृहे सुरू करण्यात येतील. पुढील आठवड्यात पुणे येथे मुलींच्या वसतिगृहाचे उद्‌घाटन होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सदरबाजार येथील शासकीय निवासस्थान परिसरात दीड महिन्यात विकसित केलेल्या वसतिगृहात आज प्रत्यक्षपणे पाच विद्यार्थी राहण्यासाठी आले असून, त्यांना खोल्यांच्या किल्ल्या दिल्या.

कार्यक्रमास पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख