माढा, बारामती मतदारसंघातील गेमचेंजर भाजपाच्या हाताशी!

राष्ट्रवादी कॉग्रेसचे खासदार धनंजय महाडीक यांचे काम खूप चांगले आहे.
माढा, बारामती मतदारसंघातील गेमचेंजर भाजपाच्या हाताशी!

कोल्हापूर : माढा आणि बारामती मतदारसंघात आम्ही दुरुस्त्या केल्या आहेत. या मतदारसंघातही महायुतीचे उमेदवार विजयी करण्याच्यादुष्टीने जोडण्या लावल्या आहेत. एका रात्रीत मोठे मताधिक्‍य मिळविणारे काही गेमचेंजर प्रत्येक मतदारसंघात भाजपाच्या हाताशी लागले आहेत, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

श्री. पाटील यांना आज "सकाळ'ला भेट दिली. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. 

पाटील म्हणाले, राष्ट्रवादी कॉग्रेसचे खासदार धनंजय महाडीक यांचे काम खूप चांगले आहे. त्यांचे मोठे आव्हान युतीच्या उमेदवारांसमोर असेल. या निवडणुकीत पक्ष आणि त्याचे चिन्ह पाहूनच मतदान होईल. त्यामुळे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हेच या निवडणुकीत विजयी होतील.

श्री. पाटील म्हणाले, "पुर्वी मी व आमदार राजेश क्षीरसागर असतील किंवा प्रकाश अबीटकर यांच्याशी मतभेद होतेच. पण आता ते आम्ही मिटविले आहेत. आम्ही एकदिलाने युतीच्या विजयासाठी काम करत आहोत. राज्यात युतीला 40 जागावर महायुती विजयी होईल. या जागा आम्ही चांगल्या मताधिक्‍याने जिंकू. माढा मतदारसंघ आणि बारामती मतदारसंघात आम्ही दुरुस्त्या केल्या आहेत. आता या मतदारसंघातही महायुतीचेच उमेदवार विजयी करण्याच्यादुष्टीने जोडण्या लावल्या आहेत. एका रात्रीत मोठे मताधिक्‍य मिळविणारे काही गेमचेंजर प्रत्येक मतदारसंघात भाजपाच्या हाताशी लागले आहेत.
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी 48 जागा महायुतीच्या येतील, असे म्हटले होते. त्याबाबत आपले मत स्पष्ट करताना मंत्री श्री. पाटील म्हणाले, पवारांनी उपरोधेपणाने हे विधान केले आहे. त्यामुळे आम्हालाही याचा राग आला आहे, म्हणूनच पुर्वी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडे असलेला बारामती मतदार संघ मी स्वतःकडे घेतला. 7 एप्रिल रोजी दिवसभर मी या मतदार संघात आहे.' 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com