chandrakant patil about jayant patil and vishvajeet kadam | Sarkarnama

जयंत पाटील चलाख तर विश्‍वजित कदम संयमी : चंद्रकांतदादा 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मिरज : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे चलाख नेते आहेत, असे टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हाणला. शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. 

आमदार श्री. पाटील यांनी महापालिका निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना बंडखोर, इव्हीएममुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पराभव स्वीकारावा लागल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना मंत्री श्री. पाटील म्हणाले,""कॉंग्रेसचे आमदार विश्‍वजित कदम यांनी निकालावर चांगली प्रतिक्रिया दिली. पराभव धक्का देणारा आहे. आत्मचिंतन करावे लागेल. विश्‍लेषण करावे लागेल, असे ते म्हणाले. 

आमदार पाटील यांनी मात्र बंडखोर, इव्हीएमवर ठपका ठेवला. ते चलाख व हुशार आहेत. बरीच वर्षे राजकारणात आहेत. तुलनेने कदम नवखे आहेत. त्यांनी संयमी प्रतिक्रिया दिली.'' 

ते म्हणाले,"इव्हीएम घोटाळ्यामुळे भाजपचे 41 नगरसेवक निवडून आले असतील तर विरोधकांचे 35 कसे आले याचीही चौकशी करा. त्यांच्या निवडीतही घोटाळा झाला आहे असे म्हणावे लागेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख