chandrakant patil about ganesh festival | Sarkarnama

गणेशोत्सव पुन्हा घरात नेण्याची वेळ आलीय : चंद्रकांतदादा 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

लोकमान्य टिळकांनी सामाजिक ऐक्‍यासाठी घरातील गणेशोत्सव चौकात आणला. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आता हा चौकातील गणेशोत्सव पुन्हा घरात नेण्याची वेळ आली आहे, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केले.

सातारा : लोकमान्य टिळकांनी सामाजिक ऐक्‍यासाठी घरातील गणेशोत्सव चौकात आणला. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आता हा चौकातील गणेशोत्सव पुन्हा घरात नेण्याची वेळ आली आहे, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केले.

वरकुटे मलवडी (ता. माण) येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, घरात भजन लावा, कीर्तन लावा आणि गणेशोत्सव साजरा करा. पण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना चौकाचौकात सिनेमातील गाणी कश्‍याला? गणेशोत्सवाचे मांगल्य जपण्यासाठी भजने लावा, कीर्तने लावा. तुम्हाला डीजेच लावायचा आहे तर त्यावर भजने लावा, एवढीच जर नाचायची हौस असेल तर मोकळ्या मैदानात जावा आणि नाचा. मग तेथे जे काय लावायचे ते लावा. सर्वसामान्य जनतेला त्रास कश्‍यासाठी?, असे पाटील म्हणाले. 

संबंधित लेख