chandrakant patil about caste validity descision | Sarkarnama

जयंतराव होते म्हणून तुम्ही वाचलात : चंद्रकांतदादा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

पोटनिवडणुकीत खर्च होणारा पैसा  पुढील निवडणुकीत  खर्च करा!

कोल्हापूर : जयंतराव (प्रा.जयंत पाटील) होते म्हणून तुम्ही वाचला. तुम्ही वाचला म्हणून महाराष्ट्र वाचला, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अपात्र ठरलेल्या नगरसेवकांकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

जात प्रमाणपत्र मुदत 1 वर्ष वाढवल्याबद्दल मंत्री पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी गेलेल्या नागरसेवकांशी ते बोलत होते. 

वेळेत जात वैधता प्रमानपत्र न देणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. यावर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. अखेर शासनाने यात मार्ग काढत जात वैधता प्रमानपत्राची मुदत एक वर्षापर्यंत वाढवली. राज्यात आशा नगरसेवकांची संख्या 9 हजार होती. कोल्हापूर महापालिकेत 19  नगरसेवक अपात्र झाले होते. शासनाने जात प्रमाणपत्र द्यायला मुदत वाढ दिल्याने या नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. शासनाच्या या निर्णयाबद्दल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कोल्हापूरच्या 19 नगरसेवकांनी अभिनंदन केले. 

नगरसेवकांना भेटल्यानंतर मंत्री पाटील म्हणाले, नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्र मुदत वाढ देण्यासाठी प्रा.जयंत पाटील पाठपुरावा करत होते. त्यामुळेच या निर्णयाला गती आली. या निर्णयामुळे पोटनिवडणुकीत खर्च होणारा पैसा  पुढील निवडणुकीत  खर्च करा, असा टोलाही मंत्री पाटील यांनी लावला.

संबंधित लेख