chandrakant patil about bhujbal and ajit pawar | Sarkarnama

सरकार मागे लागले तर काय होते ते भुजबळ- अजित पवारांना विचारा!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

चार आमदार एकत्र आलेत तरीही आम्ही त्यांना पुरून उरू -अतुल भोसले

सातारा : मलकापूरच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली आहे. आमचे सरकार एकदा मागे लागले की काय अवस्था होते ते भुजबळ व अजीत पवारांना विचारा. मलकापूरात आमची सत्ता आल्यानंतर सखोल चौकशी करून त्यांच्या घरातील तिजोरीमधला पैसाही बाहेर काढू, असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. 

आगाशिवनगर येथे भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, मदनराव मोहीते, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांना पालिकेची निवडणूक सोपी राहिली नाही. त्यामुळेच चार आमदार एकत्र येत आहेत. काहीही केले तरी मलकापूरची सत्ता भाजपकडे येईल व नगराध्यक्षही भाजपचाच असेल, असा विश्‍वास राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे व्यक्त केला. सभेला झालेली गर्दी हीच मलकापूरातील भाजपच्या विजयाची नांदी ठरेल असेही त्यांनी स्पष्‍ट केले. 
ते म्हणाले, मलकापूरच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली आहे. आमचे सरकार एकदा मागे लागले की काय अवस्था होते ते भुजबळ व अजीत पवारांना विचारा. आमची सत्ता आल्यानंतर सखोल चौकशी करून त्यांच्या घरातील तिजोरीमधला पैसाही बाहेर काढू.

 

संबंधित लेख