chandrakant patil | Sarkarnama

मराठवाड्यात एकमेकांना 'साले' म्हणतात: चंद्रकांत पाटील

सरकारनामा
शनिवार, 13 मे 2017

मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या असभ्य वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठवाड्यात एकमेकांना साले म्हणण्याची प्रथा असल्याचे म्हटले आहे.

आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त तूर आपल्या सरकारने खरेदी केली, अजून एक लाख टन तूर खरेदी करणार आहे तरी रडतात साले, अशी असभ्य भाषा रावसाहबे दानवे यांनी वापरली होती. यावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, विरोधी पक्षांकडून दानवेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. दानवेंविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. दानवे यांनी या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे.

दानवेंच्या वक्तव्याबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की रावसाहेब दानवे यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. मराठवाड्यात एकमेकांना साले असे म्हणण्याची प्रथा आहे. त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना हे वक्तव्य केले. रावसाहेब दानवे हे शेतकऱ्याचे पुत्र असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल ते सतत लढत असतात. शेतकऱ्यांबद्दल ते असे वक्तव्य करणारच नाहीत. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.

संबंधित लेख