पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझा नाही, हर्षवर्धन जाधव यांचाच निर्णय घेतील- चंद्रकांत खैरे

माझ्या उमेदवारीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. पण तत्पूर्वी ते आमदार हर्षवर्धन जाधव यांचाच निर्णय घेतील - चंद्रकांत खैरे
Khaire-Jadhav.
Khaire-Jadhav.

औरंगाबाद:  "हर्षवर्धन जाधव यांच्याकडून वारंवार माझी बदनामी करण्याचे उद्योग सुरू आहेत. या संदर्भात मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या. त्यामुळे आता ते माझा नाही तर हर्षवर्धन जाधव यांचाच निर्णय घेतील ," असा इशारा शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी ' सरकारनामा 'प्रतिनिधीशी बोलतांना दिला.

कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काल (ता.१७) कन्नड येथे पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातुन यावेळी चंद्रकांत खैरे यांच्या ऐवजी नवा चेहरा उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे सांगितले होते.

ही मागणी करत असतांना चंद्रकांत खैरे यांच्यावर ते पक्ष संपवायला निघालेत असा गंभीर आरोप देखील केला होता. भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी खैरे यांच्या उमेदवारीचा धसका घेतला आहे. त्यानां कडवी झुंज देऊ शकेल अशा उमेदवारांचा शोध सुरू असतानाच शिवसेनेच्या आमदाराकडूनच खैरे यांच्या उमेदवारीला विरोध होत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

चंद्रकांत खैरे यांनी मात्र हर्षवर्धन जाधव यांच्या मागणीवर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. जाधव यांचा बोलवता धनी दुसराच कुणी असल्याची शंका त्यांनी बोलून दाखविली. आपण त्याचा शोध नक्कीच घेऊ, असेही ते म्हणाले . 

माझ्या उमेदवारीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. पण तत्पूर्वी ते आमदार हर्षवर्धन जाधव यांचाच निर्णय घेतील ,असा सूचक इशारा देखील चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन जाधव यांची पक्षातून हकालपट्टी होणार का? यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन जाधव यांना समज दिली होती.

मातोश्रीवर मराठवाड्यातील आमदारांच्या झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला शिवसेनेत काम करायचे आहे ना? असा सवाल करत तुमच्या तक्रारी सोडवतो असे आश्वासन देत या वादावर पडदा टाकला होता.  

परंतु हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा खैरें विरोधात तोफ डागली. यावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे उद्या (ता.१९) औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com