सीबीआय किंवा सीआयडी कोणतीही चौकशी करा- खैरे

आमदार हर्षवर्धन जाधव यांना मतदारांनी धडा शिकवत जिल्हा परिषद निवडणुकीतत्यांच्या पत्नी संजना जाधव यांचा पराभव केला होता. या जळफळाटातूनच ते माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. खासदार निधीतून ज्या गावांमध्ये मीविकासकामे केली आहेत ती माझ्याच लोकसभा मतदारसंघातील आहेत.
सीबीआय किंवा सीआयडी कोणतीही चौकशी करा- खैरे

औरंगाबाद : पक्षाच्या विरोधात आघाडी करून निवडणूक लढवणाऱ्या आमदार हर्षवर्धन जाधव यांना मतदारांनी धडा शिकवत जिल्हा परिषद निवडणुकीत 
त्यांच्या पत्नी संजना जाधव यांचा पराभव केला होता. या जळफळाटातूनच ते माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. खासदार निधीतून ज्या गावांमध्ये मी 
विकासकामे केली आहेत ती माझ्याच लोकसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे हवी असेल तर त्यांनी सीआयडी, सीबीआय चौकशी करावी असे जाहीर आव्हान शिवसेनेचे 
खासदार चंद्रकांत खैरे यांनी आमदार जाधव यांना दिले. 
सरकारनामा प्रतिनिधीशी बोलतांना खासदार निधीवरून उठलेल्या वादंगावर चंद्रकांत खैरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आदेश डावलून बाजार समिती, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत स्वंतत्र आघाडी केली होती. त्यामुळे पक्षाचे नुकसान व बदनामी झाली, त्यांना पक्षातील काहीजणांची फूस आहे. आजही मुंबईला जाऊन आल्यावर जाधवांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आरोप केले आहेत. जी गावे कन्नड तालुक्‍यात नाही असा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे तो खोटा आहे. 1999-2000 मध्ये ज्या गावांमध्ये मी खासदार निधीतून विकासकामे केली आहेत, ती आजही माझ्याच लोकसभा मतदारसंघात आहेत. नव्याने झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या पुर्नरचनेत जसा पैठण व पुर्वमधील काही भाग औरंगाबादमधून जालना लोकसभा मतदारसंघात गेला. तशीच कन्नड तालुक्‍यातील काही गाव देखील इतर तालुक्‍यात गेली आहेत. म्हणजे त्या गावात काम झाली नाही, खासदारांनी निधी हडप केला असा त्याचा अर्थ होत नाही. ज्या महिला सरंपचानी खासदार निधीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी दिल्याचा दावा आमदार जाधव करतायेत, त्या महिलांना 
याची कल्पना देखील नाही असे खैरे यांनी सांगितले. 
एसडीएमला तंबी दिली 
खासदार निधीतून कामे केलेली गाव तालुक्‍यात नाहीत असा खोटा अहवाल देणाऱ्या उपविभागीय अधिकाऱ्यांना मी तंबी दिली आहे. खोटी माहिती 
दिल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबित करण्याची मागणी आपण करणार असल्याचे खैरे यांनी सांगितले. कन्नड तालुक्‍यात गावे नाहीत सांगणारे 
एसडीएम, महसुल क्षेत्रात ही गाव असल्याचे मात्र सांगतात. यावरून हेतुपूरस्पर मला बदनाम करण्यासाठी हा सगळा प्रकार सुरु आहे. या मागे 
आमच्या पक्षातील काहीजण व मुंबईचा गुरु असल्याचे खैरे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com