chandrakant khaire and shinde | Sarkarnama

शिवसेनेच्यावतीने काकासाहेब शिंदेंच्या कुटुंबियांकडे खैरेंकडून 5 लाखांची मदत सुपूर्द

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

औरंगाबाद : कायगांव टोका येथील गोदावरी पात्रात उडी घेऊन आत्महत्या करणारे काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांची शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज (ता.26) कानडगांव येथे जाऊन भेट घेतली. कुटुंबियांचे सांत्वन करतांनाच शिवसेनेच्या वतीने पाच लाखांची आर्थिक मदत देखील यावेळी सुर्पूद करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगापुर तालुक्‍यातील कायगांव टोका येथे आंदोलकांकडून रास्तारोको आणि जलसमधी आंदोलन करण्यात आले. यावेळी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदापात्रात उडी घेतल्याने यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला होता. 

दुसऱ्या दिवशी (ता. 24) काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर कायगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे कायगांव येथे आले होते. पंरतु संतप्त आंदोलकांनी त्यांना मज्जाव केला आणि धक्काबुकी करत परत पाठवून दिले. आंदोलकांच्या रोषामुळे शिवसैनिक असलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्काराला खासदार खैरे यांना उपस्थित राहता आले नव्हते. 

आज (ता.26) रोजी दुपारी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह कानडगांव येथे जाऊन शिंदे कुटुंबियांची भेट घेतली. शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी आहे असा विश्‍वास देतांनाच पाच लाख रुपयांची आर्थिक मदत शिवसेनेच्या वतीने शिंदे कुटुंबियांकडे देण्यात आली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख