chandrakant khaire about vhip shivsena | Sarkarnama

खैरेंची खैर नाही ...? 

कानोजी
रविवार, 22 जुलै 2018

मोदी सरकारविरोधात दाखल केलेल्या अविश्‍वास ठरावाबाबत नेमके करायचे तरी काय ू याबददलचा निर्णय मातोश्रीवरुन दिल्लीला पोहोचवला जात नव्हता.नेमके काय करायचे आहे याचे उत्तर न मिळाल्याने शिवसैनिक खासदार अस्वस्थ होते.

संसदेतला मतदानाचा क्षण जवळ येत असल्याने खासदार अस्वस्थ होते. अखेर प्रतोद या नात्याने औरंगाबादचे लोकप्रिय खासदार चंद्रकांत खैरे यांनी विश्‍वासमताला पाठिंबा दयायचा आहे हे गृहित धरून व्हीप जारी केला.सर्व शिवसेना खासदारांनी लोकसभेत हजर रहावे असा मोघम निरोप त्यात होता पण सेना अविश्‍वास ठरावाच्या विरोधात मतदान करणार असा त्याचा अर्थ निघाला.

दुसरीकडे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत कोणताही निर्णय झाला नाही असे सांगत होते तर शिवसेनेतील तडफदार नेते संजय राउत सरकार पडेल असे वाटत नाही पण आमचा निर्णय अदयाप बाकी आहे असा कंठशोष करीत होते.अखेर सेनेने तटस्थ रहाण्याचा निर्णय घेतला.सावंत यांनी भाषण करणेही अपेक्षित होते पण ते नंतर टळले.

मोदींना भाजपच्या संख्याबळापेक्षा जास्त मते मिळाली मात्र सेना वेगळीच राहिली.तटस्थ ,बाजूला. हे का घडले याचा अभ्यास भाजप करेलही पण सेनेतला ज्वलंत मुददा आहे तो खैरे यांनी संमती नसताना पत्र जारी केलेच कसे.सेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांच्याशी खैरेंचे उत्तम संबंध आहेत पण तरीही मंजूर नसताना काढलेल्या या व्हीपबददल खैरेंना किंमत चुकवावी लागणार आहे. खैरेंची खैर नसल्याने अन्य स्पर्धक खासदार , राज्यातले मंत्री मात्र खुषीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख