चंद्रकांतदादांनी परभणीत दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

 चंद्रकांतदादांनी परभणीत दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

परभणी : परभणी लोकसभेसह जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात निवडणुका जिंकायच्या आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे सांगून महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. परभणीत रविवारी भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भारतीय जनता पार्टीच्या महानगर शाखेच्या वतीने रविवारी (ता.24) येथील श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयात परभणी विधानसभा बुध कार्यकर्ता मेळावा व राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर,आमदार मोहन फड, माजी आमदार विजय गव्हाणे,महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे आदींची उपस्थिती होती. 

श्री.दानवे म्हणाले, देशात भाजपाविरोधात कितीही वल्गना झाल्या तरी भाजपची देशात 22 राज्यात सत्ता आली आहे. संघटना मजबूत असल्यामुळेच हे शक्‍य झाल्याचे सांगत आगामी निवडणुकासाठी बुधनिहाय संघटन आणखी मजबुत करावे, परभणी लोकसभेसह जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात निवडणूक जिंकायची आहे असे सांगत त्यांनी स्वबळाचे संकेत दिले. महसुल मंत्री श्री. पाटील म्हणाले, बुथनिहाय संघटन मजबुत केले तर आपलाच पुन्हा विजय आहे असे सांगून बुथ मजबुत करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

श्री. लोणीकर म्हणाले, परभणी जिल्हा हिंदुत्ववादी जिल्हा असल्याने आतापर्यंत येथे दगडधोड्यांना निवडून दिले आहे. अनेक गावात शाखा नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदीमुळे शिवसेनेला मतदान पडल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, वेळ आली आणि त्यांनी युती तोडली तर स्वबळावर निवडणुक जिंकू असे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com