chandni chauk flyover work start in week | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम आठवडाभरात सुरु होणार

अमोल कविटकर, पुणे
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पालकमंत्री या नात्याने गडकरी यांच्याशी चर्चा केल्यावर या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या आठवडाभरात काम सुरु होणार आहे. काम सुरु करण्यासंदर्भातील आदेश हैदराबाद येथील कंपनीला देण्यात आले आहेत.

गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया कासव गतीने सुरु असल्याने गेले सव्वा वर्ष प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकली नाही. आताच्या घडीलाही पंचाऐंशी टक्के जागा ताब्यात आल्या आहेत. संपूर्ण जागा ताब्यात आल्याशिवाय राष्ट्रीय महामार्ग खाते काम सुरु करत नाही. मात्र प्रकल्पाला होणारा उशीर आणि आगामी निवडणुका लक्षात ठेऊन काम सुरु करण्यास परवानगी दिली गेली आहे. 

या संदर्भात पालकमंत्री बापट म्हणाले, "हैदराबाद येथील एनसीसी या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. तशी 'वर्क ऑर्डर' भारतीय राजमार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाने शुक्रवारी दिली आहे. पहिल्या टप्प्यात ३९७ कोटी रूपयांची कामे पूर्ण करावीत, असे आदेश एनसीसी कंपनीला देण्यात आले आहेत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर येत्या आठवडाभरात हे काम सुरू होईल.

"चांदणी चौकाचे हे काम एकूण ४९५ कोटी रूपयांचे आहे. त्यासाठी लागणारे भूसंपादन महापालिकेने करायचे आहे. महापालिकेने एकूण पंचाऐंशी टक्के भूसंपादन यापूर्वीच केले आहे. उरलेल्या पंधरा टक्के भूसंपादनाची प्रक्रिया अंतीम टप्यात आहे. शंभर टक्के भूसंपादन झाल्याशिवाय केन्द्रीय महामार्ग खाते काम सुरू करण्यास तयार नव्हते. पालकमंत्री या नात्याने गडकरी यांच्याशी चर्चा केल्यावर या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला. मुंबई पुणे, हिंजवडी आयटी पार्क, बंगलोर हायवे या रस्यावरील वाहतूक अधिक गतिमान होण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी पडेल", असेही बापट म्हणाले.

संबंधित लेख