chandarakant patils sorry not impactfull | Sarkarnama

चंद्रकांतदादांच्या दिलगिरीचा उपयोग झालाच नाही; आगडोंब उसळालाच! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

सांगली : मराठा समाजाच्या आंदोलनात पेड समाजकंटक घुसले आहेत. ते मराठा आंदोलनाची बदनामी करीत आहेत या वक्तव्याबाबत आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलगीरी व्यक्त केली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असून त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर "हात जोडून साष्टांग दंडवत घालतो, परंतू हिंसाचार' थांबवा अशी विनंती त्यांनी केली. मात्र मराठा आंदोलकांनी या दिलगिरीला महत्त्व दिल्याचे दिसले नाही. दिवसभर राज्य पेटलेले होते. 

श्री. पाटील कालपासून महापालिका निवडणूक प्रचारासाठी सांगलीत आले होते. तेव्हा मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी "विध्वंस निर्माण करणारे मोर्चात घुसलेत. त्यामुळे मराठा नेत्यांनी काळजी घ्यावी' असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे आज राज्यभरात पडसाद उमटले. त्यामुळे त्यांना खुलासा करावा लागला. 
ते म्हणाले,"" मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून आंदोलन भडकवले जात आहे. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर वक्तव्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी हात जोडून, साष्टांग दंडवत घालून विनंती करतो. हिंसाचार थांबवा. महाराष्ट्राची ही परंपरा नाही. सामंजस्याने प्रश्‍न सोडवणारी आपली परंपरा आहे. काल मी वक्तव्य केलेल्या एका वाक्‍याचा विपर्यास केला गेला. क्रांती मोर्चाने 58 मोर्चे शांततेत काढले. जगभर त्याची वाहवा झाली. सरकारनेही दखल घेतली. आता या आंदोलनाला हिंसाचारामुळे गालबोट लावले जात आहे. मी मराठा समाजाला कोणतेही दूषण दिले नाही की वाईट म्हटलेले नाही. 

संबंधित लेख