Challenge Before CBI to Reach Upto Main Conspirator Says Hamid Dabholkar | Sarkarnama

आता मुख्य सुत्रधारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान : डॉ. हमीद दाभोलकर 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 19 ऑगस्ट 2018

साताऱ्यात तर दर वर्षी 19, 20 ऑगस्टला डॉ. दाभोलकरांना अभिवादन करून अंनिसचे कार्यकर्ते व दाभोलकर कुटुंबिय जिल्हा प्रशासनाला तपासाबाबत साकडे घालत होते. या घटनेला पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी एक दिवस आधी का होईना मारेकऱ्यांना शोधण्यात तपासी यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे या सर्व घटनेच्या मागचा मुख्यसूत्रधार कोण हेही आता लवकरच उघड होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. दाभोलकरांचे चिरंजीव डाॅ. हमीद दाभोलकर यांच्याशी संवाद साधला.

सातारा : डॉ. दाभोलकर यांच्या खूनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून काढण्याचे आणि मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे. ते आव्हान सीबीआय निश्‍चिमपणे पूर्ण करेल, अशी अपेक्षा डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला उद्या (ता. 20) पाच वर्षे पूर्ण होत आहेत. 20 ऑगस्टला त्यांचा पुण्यात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. पण या घटनेला पाच वर्षे पूर्ण होत आली तरी नेमके खूनी कोण हे निष्पन्न होत नव्हते. अंधश्रध्दा निर्मूलन समिती, डॉ.दाभोलकर कुटुंबिय आणि अनेक सामाजिक संस्था संघटनांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत दाभोलकरांच्या खून्यांना शोधून कडक शिक्षा करा, यासाठी आंदोलने, रॅली काढून लोकशाही मार्गाने आवाज उठविला होता. दाभोलकर कुटुंबियांनी पंतप्रधानांपर्यत जाऊन तपासाबाबत आपले म्हणणे मांडले होते. 

साताऱ्यात तर दर वर्षी 19, 20 ऑगस्टला डॉ. दाभोलकरांना अभिवादन करून अंनिसचे कार्यकर्ते व दाभोलकर कुटुंबिय जिल्हा प्रशासनाला तपासाबाबत साकडे घालत होते. या घटनेला पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी एक दिवस आधी का होईना मारेकऱ्यांना शोधण्यात तपासी यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे या सर्व घटनेच्या मागचा मुख्यसूत्रधार कोण हेही आता लवकरच उघड होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. दाभोलकरांचे चिरंजीव हमीद दाभोलकर यांच्याशी संवाद साधला.

हमीद दाभोलकर म्हणाले, ''तपासात प्रगती होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने सीबीआयच्या मागे तपासात सुधारणा घडवून आणण्याबाबत सूचना केली होती. वेळोवेळी कडक शब्दात सीबीआयवर ताशेरे ही ओढले होते. अंनिसचे कार्यकर्ते आणि दाभोलकर कुटुंबियांनीही तपासासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. यासोबतच समाजातील अनेकांनी शांततेच्या व विधायक आंदोलने केली होती. यामुळे यंत्रणेवर नैतिक दबाव वाढत होता. पण वेळ येत नव्हती. ही वेळ नालासोपाराच्या घटनेमुळे आली. यातील संशयितांच्या चौकशीतून याचे धागेदोरे हाती लागले. यातूनच तपासी यंत्रणेला डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी कोण याचा उलगडा करता आला आहे." आता सीबीआयपुढे यांची पाळेमुळे खणून काढण्याचे व मुख्यसूत्रधार शोधण्याचे आव्हान आहे. हे आव्हान सीबीआय निश्‍चिमपणे पूर्ण करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
 

संबंधित लेख