chakan voilance to defame maratha agitators | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

चाकणमधील हिंसाचार : मराठा आंदोलकांना बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 30 जुलै 2018

आंबेठाण : ""आमचे आंदोलन शांततेत सुरू करण्यात आले आणि शेवटदेखील शांततेत झाला, परंतु काही अज्ञात समाजकंटकांनी अगदी शेवटच्या टप्प्यात जमावात घुसून गाड्या फोडल्या आणि काही गाड्या जाळल्या आहेत. यात आमच्या स्थानिक आंदोलकांपैकी कोणीही नाही, अशा घटना घडवून मराठा समाजाला बदनाम करण्याचा डाव आहे,'' असा दावा चाकण येथील आंदोलनाच्या आयोजकांच्या वतीने केला आहे.
 

आंबेठाण : ""आमचे आंदोलन शांततेत सुरू करण्यात आले आणि शेवटदेखील शांततेत झाला, परंतु काही अज्ञात समाजकंटकांनी अगदी शेवटच्या टप्प्यात जमावात घुसून गाड्या फोडल्या आणि काही गाड्या जाळल्या आहेत. यात आमच्या स्थानिक आंदोलकांपैकी कोणीही नाही, अशा घटना घडवून मराठा समाजाला बदनाम करण्याचा डाव आहे,'' असा दावा चाकण येथील आंदोलनाच्या आयोजकांच्या वतीने केला आहे.
 
आंदोलन झाल्यानंतर आंदोलक माघारी जात असताना अचानक काही तरुणांच्या टोळक्‍याने गाड्यांवर दगडफेक सुरू केली, तर काही गाड्या पेटविल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तरुणांच्या टोळक्‍याने एसटी बस, पीएमपी बस, काही मालवाहू गाड्या यांना लक्ष करून पेटवून दिल्या. त्यानंतर त्या टोळक्‍याने पोलिसांना लक्ष्य करून त्यांच्या गाड्या पेटवून दिल्या. आक्रमक झालेला जमाव पोलिस ठाण्यावर चालून गेला आणि पोलिस स्टेशनवर दगडफेक केली, तर बाहेर असणाऱ्या पोलिसांच्या काही गाड्यांची मोडतोड केली. 

जुन्या- पुणे नाशिक रस्त्याने जात असताना या टोळक्‍याने काही दुकानांची मोडतोड करून सीसीटीव्ही तोडले. जो कोणी मोबाईलवर शूटिंग किंवा फोटो काढत असेल, त्यांचे मोबाईल मारहाण करून हिसकावून घेऊन ते फोडण्यात आले. चाकण बस स्थानकाच्या आवारातदेखील काही गाड्या जाळण्यात आल्या. ही जाळपोळ करणाऱ्यांमध्ये मोर्चेकरी किंवा स्थानिक कोणीही नव्हते, असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

ठराविक पोलिस लक्ष्य
 
चाकण शहरात झालेल्या हिंसक घटनेत चाकण पोलिस स्टेशनमधील काही ठरावीक कर्मचाऱ्यांना लक्ष करण्यात आल्याचे आजच्या घटनेवरून जाणवले. यात एक ते दोन पोलिस कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करण्यात आली. तसेच, त्यापैकी ज्या एकाने शूटिंग केले होते, त्यांनाही मारहाण करून त्यांचा मोबाईल फोडण्यात आला. एका कर्मचाऱ्याची मोटार पेटवून देऊन अन्य काहींच्या गाड्यांची मोडतोड करण्यात आली. संतप्त जमावाला पोलिस स्टेशनला आलेले पाहून पोलिसांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. 
 
 

संबंधित लेख