Chagan Bhujbal Yeola Tour | Sarkarnama

छगन भुजबळांचा चार वर्षानंतर येवल्यात बैठकांचा धडाका 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 24 जुलै 2018

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उद्या (ता. 25) आपल्या होमपीचवर मुक्‍कामी येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपुजन होईल. विशेष म्हणजे निवडून आल्यानंतर विविध कायदेशीर अडचणीत सापडल्याने ते गेल्या चार वर्षात मतदारसंघात येऊ शकले नव्हते.

येवला : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उद्या (ता. 25) आपल्या होमपीचवर मुक्‍कामी येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपुजन होईल. विशेष म्हणजे निवडून आल्यानंतर विविध कायदेशीर अडचणीत सापडल्याने ते गेल्या चार वर्षात मतदारसंघात येऊ शकले नव्हते. आता तब्बल चार वर्षानंतर मतदारसंघात त्यांच्या उपस्थितीत विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. अधिकाऱ्यांच्या बैठका, कार्यकरर्ते, मतदारांशी मॅरेथॉन चर्चा असा त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आहे.

या दौऱ्यात मतदारसंघातील आठ कोटींच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन, भूमीपुजन होईल. उच्च्पदस्थ अधिका-यांसमवेत पहाणी, आढावा बैठका होतील. यामुळे मतदारसंघात विकासाची खंडीत प्रक्रीया पुन्हा सुरु होईल, असे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी सांगितले. यावेळी नाशिकला भुजबळ फार्म येथे कार्यकर्त्यांची भेट घेऊन सायंकाळी सहाला चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यांनंतर येवला येथील संपर्क कार्यालय येथे कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर मुक्‍काम करणार आहेत. यामध्ये पुणेगांव - दरसवाडी पोहच कालवा कामाची ते पाहणी करणार आहेत

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

संबंधित लेख