Chagan bhujbal visits maharashtra sadan | Sarkarnama

ज्यामुळे तुरुंगात जावे लागले त्या महाराष्ट्र सदनच्या भेटीला छगन भुजबळ

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे : नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी छगन भुजबळ यांना तुरुंगाची हवा खाली लागली. तब्बल दोन वर्षांच्या तुरुंगातील मुक्कामानंतर भुजबळ आता पुन्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले आहेत. या सक्रियतेनुसार त्यांनी आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला भेट दिली. 

हे सदन दिल्लील अनेकांच्या कौतुकाचा विषय आहे. येथे भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकाही झाल्या. देश पातळीवरील अनेक बैठका या सदनात होतात. कोपर्निकस मार्गावरील ही वास्तू अनेकांचे लक्ष वेधून घेते.  `सदन बनाया सुंदर लेकीन बनानेवाला गया अंदर,`अशी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांची प्रतिक्रियाही माध्यमांत प्रसिद्ध झाली होती. पण याच सदनाच्या बांधकामासाठी बिल्डरला अतिरिक्त फायदा दिल्याचा ठपका भुजबळ यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

तर अशा या महाराष्ट्र सदनाला छगन भुजबळ यांनी भेट देऊन पाहणी केली. या भवनाचे निर्माते दाखल झाल्याने मग त्यांच्याभोवती गर्दीही जमा झाली आणि कॅमेऱ्यांचे फ्लॅशही उडले. आता या सदनाला भेट दिल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया कळू शकली नाही. पण त्यांच्या डोळ्यासमोर भवनाच्या भूमिपूजनासाठी मारलेली पहिली कुदळ ते आर्थर रोड जेलमधील मुक्काम हा प्रवास नक्कीच तरळला असेल. 

संबंधित लेख