Chagan Bhujbal supports Maratha reservation | Sarkarnama

एससी, एसटी, ओबीसी घटकांवर अन्याय न होता मराठा आरक्षण देण्यात यावे : छगन भुजबळ

सरकारनामा
शनिवार, 28 जुलै 2018

मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा सगळ्यांचा  पूर्ण पाठिंबा आहे. एससी, एसटी, ओबीसी घटकांवर अन्याय न होता हे आरक्षण देण्यात यावे.

-छगन भुजबळ

मुंबई : " मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा सगळ्यांचा  पूर्ण पाठिंबा आहे. एससी, एसटी, ओबीसी घटकांवर अन्याय न होता हे आरक्षण देण्यात यावे. यासाठी जर कायदा दुरुस्ती आवश्यक असल्यास ती ताबडतोब करण्यात यावी, भारतीय राज्य  घटनेत तशी तरतूद करून घेण्यात यावी ,"अशी मागणी  माजी उप -मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

मराठा आरक्षण तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चेसाठी सर्वपक्षीय सदस्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे घेण्यात आली. त्यानंतर श्री . भुजबळ पत्रकारांशी बोलत होते . 

" संसदेत मराठा  आरक्षण विधेयक संमत करण्यासाठी लागणारे  दोन तृतीयांश बहुमत होण्यासाठी शरद  पवार साहेब स्वतः सहकार्य करायला तयार आहेत. मराठा  समाजाच्या आंदोलना दरम्यान आत्महत्या, हिंसाचार यापासून सर्वांनी दूर रहावे."

"मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची धरपकड अटक ताबडतोब थांबवावी. अनेक लोकांना कारण नसतं तुरुंगात टाकण्यात आले आहे त्यांना तातडीने सोडावे .   मागासवर्ग आयोगाचा निकाल आल्यानंतर जर त्यात कायद्याची त्रुटी असेल आणि बदल गरजेचे असतील तर ताबडतोब विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे. आम्ही सर्व त्यास सहकार्य करू," असे  भुजबळ म्हणाले . 
 

संबंधित लेख