Chagan Bhujbal Recalls Event Two Years Back | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

त्या आजीबाईच्या आठवणीने छगन भुजबळांचे डोळे पाणावले! 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

ओबीसींचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावरील 'ईडी'ची कारवाई झाली. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिकला निघालेल्या ओबीसी मोर्च्याला आज दोन वर्षे झाली. त्या दिवसांच्या आठवणींना आज छगन भुजबळ यांनी उजाळा दिला.

नाशिक : ओबीसींचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावरील 'ईडी'ची कारवाई झाली. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिकला निघालेल्या ओबीसी मोर्च्याला आज दोन वर्षे झाली. त्या दिवसांच्या आठवणींना आज छगन भुजबळ यांनी उजाळा दिला. मोर्चा काढणाऱ्या पाठीराख्यांविषयी त्यांनी आज कृतज्ञता व्यक्त केली. "एका 85 वर्षीय आजीबाईने भविष्यासाठी ठेवलेली आपली पुंजी मोर्च्याच्या खर्चासाठी दिली," या आठवणींनी डोळे पाणावले अशी भावना व्यक्त केली. 

माजी मुख्यमंत्री भुजबळ, माजी खासदार छगन भुजबळ यांच्यावरील कारवाईने या कुटुंबीयांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांत होती. त्याविषयी 3 ऑक्‍टोबर, 2016 रोजी राज्यभरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नाशिकला मोर्चा काढला होता. त्याला लाखोंची गर्दी झाली होती. अनेकांनी त्यासाठी पदरमोड केली. एका 85 वर्षीय आजीबाईने भविष्यासाठी ठेवलेली पुंजीसुध्दा मोर्च्यातील खर्चासाठी दिल्याची आठवण भुजबळांनी करुन दिली. याची माहिती मिळाल्यावर आपले डोळे पाणावले. या सर्व शुभेच्छांमुळेच आमचे मनोबल टिकून राहिल्याचा उल्लेख करीत त्यांनी त्याबद्दल आज कृतज्ञता व्यक्त केली. त्यासाठी आम्ही हात जोडून आभार मानतो, असे त्यांनी म्हटले आहे. 

संबंधित लेख