chagan bhujbal criticise devendra fadavnis | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

मुख्यमंत्र्यांनी 'मेक इन महाराष्ट्रा'चा नाद सोडला वाटतो : छगन भुजबळ

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 डिसेंबर 2018

दहा स्मार्ट सिटी करणार होता ना... मग एक तरी करायची होती ना...

मुंबई : भाजप सरकार बोलते खूप आणि करत काही नाही, म्हणजे या सरकारची कथनी एक आणि करणी वेगळी आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केली.

अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार छगन भुजबळ यांनी भाजप सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये काही वर्तमान पत्रातील बातम्यांचा संदर्भ देत अनेक योजनांमध्ये सरकार कसे फेल ठरले आहे हे दाखवून दिले.

दहा स्मार्ट सिटी करणार होता ना... मग एक तरी करायची होती ना... करता येत नाहीतर पडता कशाला त्यामध्ये...अशी विचारणाही आमदार छगन भुजबळ यांनी सरकारला केली. 

या चार वर्षात राज्यावर लाखो कोटी रुपयांचे कर्ज वाढले. बेरोजगारी वाढली, नोकऱ्या काही दिल्या नाही... लोकांवर समृध्दी महामार्ग लादला... बुलेट ट्रेन... असे जाचक प्रकल्प जनतेवर लादले जात आहेत. ओबीसी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत. सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले असून या सरकारने राज्य दिवाळखोरीकडे ढकलले आहे असा आरोप आमदार छगन भुजबळ यांनी केला.

सनातन संस्थेचे राज्य आले असं भासत आहे. कोणाचेही खुन केले जात आहेत त्यांना रोखणारे कोणीही नाही.साधकांच्या घरात स्फोटकं सापडत आहेत. सरकार मेक इन इंडिया म्हणतं हे काय बॉम्ब बनवायला आहे का ? असा सवालही आमदार छगन भुजबळ यांनी केला.

हे लोक अंधश्रद्धा पसरवत आहे. माझ्या शेतातील आंबे खा तुम्हाला मुलं होतील अशी अंधश्रद्धा बोलून दाखवली जात आहे. त्यांना मोकाट सोडले जात आहे. तरुण तडफदार मुख्यमंत्र्यांचं हे राज्य आहे असं राज्य चाललं तर कसं चालेल ?असा रोखठोक सवालही आमदार छगन भुजबळ यांनी केला. 

संबंधित लेख