Chagan Bhujbal to be present for Save Constitution Rally | Sarkarnama

छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये संविधान बचाओ रॅली 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

सरकारकडे कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर नाही. नोटाबंदी व विविध निर्णयामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. माहिलांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे. लोकशाहाची कोणताही स्तंभ सुरक्षित नाही. सरकार स्वतः गुंडगिरीला शाब्बासकी देत आहे, असे सरकार विरोधकांचे आरोप आहेत. त्यातून 'संविधान बचाओ.. भारत बचाओ' हा कार्यक्रम देशभर घेतला जात आहे.

नाशिक : 'समाजात द्वेष पसरिवला जात आहे. त्याला सरकारचे प्रोत्साहन आहे. यातून सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे,' असा आरोप करीत या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे गुरुवारी (ता.23) 'संविधान बचाओ... देश बचाओ' कार्यक्रम होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ही संविधान बचाओ रॅली होईल. 

सरकारकडे कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर नाही. नोटाबंदी व विविध निर्णयामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. माहिलांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे. लोकशाहाची कोणताही स्तंभ सुरक्षित नाही. सरकार स्वतः गुंडगिरीला शाब्बासकी देत आहे, असे सरकार विरोधकांचे आरोप आहेत. त्यातून 'संविधान बचाओ.. भारत बचाओ' हा कार्यक्रम देशभर घेतला जात आहे. त्याची सुरवात दिल्ली येथून झाली. मुंबई, नागपूर नंतर आता नाशिकला हा कार्यक्रम होत आहे. 

या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी मंत्री फौजिया खान, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार विद्या चव्हाण, माजी खासदार समीर भुजबळ यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील. रॅलीची तयारी सुरु आहे असी माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख