लोकांचे माझ्यावरचे प्रेम अटॅच करता आले नाही - छगन भुजबळ

लोकांचे माझ्यावरचे प्रेम अटॅच करता आले नाही - छगन भुजबळ

पुणे : अडीच वर्षापूर्वी माझ्यावर हल्लाबोल झाला, धाडीवर धाडी पडल्या, खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या, न सापडलेल्या वस्तू सापडल्या असे सांगितले गेले, माझी सगळी घरे अटॅच केली गेली, जे दिसले ते सगळे अटॅच केले गेले पण माझ्यावर असलेले लोकांचे प्रेम कुणी अटॅच करू शकले नाही अशी दणदणीत प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. यावेळी सभेला उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना दाद दिली. आपल्या अटकेसंदर्भात तसेच त्या काळात घरातल्यांना काय काय भोगावे लागले तेही त्यांनी यावेळी कथन केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोपाची सांगता सभा पुण्यात रविवारी झाली त्यावेळी भुजबळ यांचे भाषण झाले. आपल्या घणाघाती भाषणात 
छगन भुजबळ म्हणाले, कुठलेही कारण नसताना व माझा काहीही दोष नसताना मला तुरुंगात टाकण्यात आले. माझे निर्दोषत्व मी न्यायदेवतेसमोर सिद्ध करेन. 
आरक्षणाबाबात बोलताना ते म्हणाले माझा मराठा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्याबद्दल कौतुकाने बोलून मी राष्ट्रवादी कॉंग्रेस कधीच सोडणार नाही अशी ग्वाही दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com